मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावर 'ईडी'ची कारवाई अन् सोमय्यांनी पुन्हा संधी साधली

सक्त वसुली संचालनालयाने (ED) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.
Kirit somaiya
Kirit somaiya Sarkarnama

मुंबई : सक्त वसुली संचालनालयाने (ED) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मेहुण्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. ठाकरेंचे मेहुणे श्रीधर माधव पाटणकर (Sridhar Patankar) यांची 6.45 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे. पुष्पक बुलियन प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. यावरून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याची संधी सोडली नाही.

ईडीने करचुकवेगिरी प्रकरणी पुष्पक बुलियन आणि समूहातील इतर कंपन्यांच्या विरोधात 6 मार्च 2017 रोजी गुन्हा दाखल केला होता. आता श्रीधर पाटणकर यांच्या 11 फ्लॅटवर ईडीने टाच आणली आहे. यावरून सोमय्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना लक्ष्य केले आहे. याधीही पाटणकर यांच्यावर सोमय्यांनी आरोप केले होते. आता सोमय्या म्हणाले की, श्रीधर पाटणकर, उद्धव ठाकरेंचा साला (मेहुणा) करचुकवेगिरी घोटाळा...बनावट कंपन्यांचा वापर. ईडीने मालमत्ता जप्त केली आहे. घोटाळेबाजांना सोडणार नाही.

Kirit somaiya
राजकारण तापलं! मुख्यमंत्री ठाकरेंच्या मेहुण्यालाच 'ईडी'चा दणका

या प्रकरणी ईडीने आधी महेश पाटील, चंद्रकांत पटेल आणि त्यांचे कुटुंबीय व त्यांच्या मालकीच्या कंपन्यांची 21.46 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. पुष्पक ग्रुपमधील पैसे महेश पटेल यांनी पुष्पक रिअॅलिटीचे नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या सहाय्याने इतर कंपन्यांत वळवल्याचे ईडीच्या तपासात समोर आले होते. नंदकिशोर चतुर्वेदी यांनी बनावट कंपन्यांत हा पैसा वळवला होता. या कंपन्यांच्या माध्यमातून श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडला 30 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले. हे कर्ज सुरक्षित पद्धतीने देण्यात आलेले नव्हते.

Kirit somaiya
मोठी घडामोड : अखिलेश यादव, आझम खान यांच्यानंतर आता योगींचाही राजीनामा

साईबाबा गृहनिर्मिती ही पाटणकर यांच्या मालकीची आहे. त्यामुळे या कंपनीच्या मालकीचे 11 फ्लॅट ईडीने जप्त केले आहेत. या फ्लॅटची किंमत 6.45 कोटी रुपये आहे. ईडीने ठाण्यात आज सकाळी ही मोठी कारवाई केले. 'नीलांबरी' प्रकल्पातील हे 11 फ्लॅट जप्त करण्यात आले आहेत. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे आहेत. यापूर्वी मनी करचुकवेगिरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज त्यांच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com