Kirit Somaiya On Parab : परबांचा नाक घासून माफी मागावीच लागेल इशारा; सोमय्या म्हणाले,''जो जेल आणि जामिनाच्यामध्ये...''

Sai Resort Update News : '' हिशोब तर घेणारच...''
Anil Parab- Kirit Somaiya News Update
Anil Parab- Kirit Somaiya News Update Sarkarnama

Mumbai : मागील काही दिवसांपासून दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. या प्रकरणी ठाकरे गटाचे नेते व आमदार अनिल परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोली येथील साई रिसॉटप्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) नेते माजी मंत्री अॅड. अनिल परब यांच्याविरोधातील याचिका मागे घेतली आहे. मात्र, यानंतर परबांनी सोमय्यांवर घणाघाती टीका करतानाच सोमय्या हे बिनबुडाचे आरोप करतात आणि पुढे सोडून देतात. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की,सोमय्यांना नाक घासून माफी मागावे लागले असं परब म्हणाले होते. त्याला आता किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते अनिल परबांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. सोमय्या म्हणाले, आर्धे रिसॉर्ट पाडण्यात आलं आहे. राहिलेलंही पाडण्यात येणार आहे. एक जेलमध्ये आहे. दुसरा बेलवर आहे. सदानंद कदम तीन महिने झालं जेलमध्ये आहेत. तर, अनिल परब तीन जामिनावर आहेत. हिशोब तर घेणारच असा इशारा सोमय्यांनी दिली आहे.

Anil Parab- Kirit Somaiya News Update
Anil Parab News : किरीट सोमय्यांनी नाक घासून माफी मागावीच लागेल; अनिल परबांचा इशारा

... त्याने निर्दोष असल्याचं सांगू नये!

अनिल परब(Anil Parab) उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले तरीही खर्च केलेले साडेदहा कोटी रुपये कुठून आले, याचं उत्तर द्यावं लागणार आहे. आयकर विभागाने अनिल परब यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल केले आहेत. परब निर्दोष आहेत, तर जामिनावर का सुटले? जेलमध्ये राहून सत्याग्रह करायचा होता. जो जेल आणि जामिनाच्यामध्ये आहे, त्याने निर्दोष असल्याचं सांगू नये असा टोला सोमय्यांनी परबांना लगावला आहे.

Anil Parab- Kirit Somaiya News Update
Ashok Gehlot Vs Sachin Pilot : विधानसभा निवडणुकीआधी राजस्थानमध्ये काँग्रेसमध्ये मोठी घडामोड; गेहलोत- पायलट संघर्षावर...

परबांना काही दिवसांचा दिलासा...

सोमय्या यांनी आमदार अनिल परबांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, त्यांनी समुद्राची जागा बळकावली होती. रिसॉर्ट प्रकरणीच सदानंद कदम(Sadanand Kadam) जेलमध्ये आहेत. निर्दोष असते, तर जेलमध्ये का घातलं? तात्पुरती कारवाई होऊ नये म्हणून न्यायालयात का गेलात? अजून तर हिशोब व्हायचा आहे. रिसॉर्ट अनिल परबांनी बांधला असून, त्यांच्याकडून विकत घेतला आहे असं कदमांनी सांगितलं आहे. अनिल परबांनी चोरी, लबाडी आणि अनधिकृत काम केली आहेत. त्यांचे सहकारी जेलमध्ये आहेत, मग हे बाहेर कसं राहू शकतील. हे सध्या जामिनावर आहेत. काही दिवसांचा दिलासा असा टोलाही सोमय्यांनी परबांना लगावला आहे.

'या' भीतीने किरीट सोमय्यांनी ही याचिका मागे घेतली

किरीट सोमय्यांनी याचिका मागे घेतल्यानंतर परबांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सोमय्यांवर जोरदार हल्ला चढविला. परब म्हणाले, दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी आमची चौकशी केली. गेली दीड वर्षे माझी नाहक बदनामी करण्यात आली. याप्रकरणात तथ्य नसल्याचं सुरुवातीपासून सांगतोय. सोमय्या नेहमीच्या सवयीप्रमाणे खोटे आरोप करत आहेत. राष्ट्रीय हरित लवादात हे प्रकरण सुनावणीला आलं, तेव्हा या प्रकरणात काही तथ्य नाही. आम्ही हे प्रकरण बरखास्त करत आहोत असं न्यायमूर्तींना सांगितलं. तेव्हा आपली अब्रू जाईल या भीतीने सोमय्यांनी ही याचिका मागे घेतल्याचंही परब यावेळी म्हणाले.

Anil Parab- Kirit Somaiya News Update
Raj Thackeray News : देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला; 'शिवतीर्थ'वर 'राज'कीय समीकरणं?

सोमय्यांना नाक घासून माफी मागावे लागेल...

सोमय्या (Kirit Somaiya) हे बिनबुडाचे आरोप करतात आणि पुढे सोडून देतात. त्या माध्यमातून बदनामी करण्याचे त्यांचे धोरण असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला आहे. परब म्हणाले, "साई रिसॉर्ट प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, हे मी सुरूवातीपासून वारंवार सांगत होते. ते माझ्या मित्राचे आहे. मी त्याला जागा विकली होती. मात्र जाणूनबूजून माझ्यावर खोटे आरोप केले गेले.

सोमय्या सवयीप्रमाणे बिनबुडाचे आरोप करतात. त्यानंतर अशी प्रकरणे अंगलट येतात, असे लक्षात आले की मागे घ्यायची. ही त्यांनी नेहमीच सवय आहे.उच्च न्यायालयातही काही याचिका आहेत. ते गुन्हे खोटे असल्याचे आम्ही सिद्ध करू. आता एकएक ठिकणाी त्यांना याचिका मागे घ्यावी लागत आहे. किंवा या याचिका रद्द होतील. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की सोमय्यांना नाक घासून माफी मागावे लागेल. किंवा त्यांना आम्ही दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्याचे १०० कोटी द्यावे लागतील.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com