मलिकांना सरकारचे पाहुणे बनावे लागणार ; सोमय्यांनी उडवली खिल्ली

नवाब मलिकांच्या (Nawab Malik) टि्वटला भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी (BJP leader Kirit Somaiya) उत्तर दिलं आहे.
मलिकांना सरकारचे पाहुणे बनावे लागणार ; सोमय्यांनी उडवली खिल्ली
Kirit Somaiya, Nawab Malik sarkarnama

पुणे : ''राजकीय आकसापोटी भाजप महाविकास आघाडीच्या नेत्यांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चैाकशी करीत असल्याचा आरोप आघाडीचे नेते करीत आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी मध्यरात्री नवाब मलिकांनी केलेलं टि्वट सध्या चर्चेत आहे.

एनसीबी, ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांनी राज्यातील सत्ताधारी पक्षांमधील काही महत्त्वाच्या नेत्यांच्या चौकशा सुरू केल्यापासून हा विरोध अधिक वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मलिकांचे टि्वट आहे. तपास यंत्रणा आपली चैाकशी करणार असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे या टि्वटच्या माध्यमातून सांगितलं आहे.

नवाब मलिकांच्या (Nawab Malik) या टि्वटला भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी (BJP leader Kirit Somaiya) उत्तर दिलं आहे. ''आपल्या घरी सरकारी पाहुणे येणार नाही, तर आपल्यालाच सरकारचे पाहुणे बनावे लागणार,'' अशा खोचक शब्दात सोमय्यांनी मलिकांवर निशाणा साधला आहे. याबाबतचा व्हिडिओ सोमय्यांनी समाजमाध्यमांवर शेअर केला आहे.

आपल्या टि्वटमध्ये मलिक म्हणतात, “साथियों, सुना है, मेरे घर आज कल मे सरकारी मेहमान आने वाले है, हम उनका स्वागत करते है. डरना मतलब रोज रोज मरना, हमे डरना नहीं, लड़ना है, गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से.'' एक-दोन दिवसात तपास यंत्रणा आपल्या घरी येईल, अशी शक्यता मलिकांनी व्यक्त केली आहे. ''घाबरणं म्हणजे रोज मरणं. आपल्याला घाबरायचं नाही, लढायचं आहे,'' असं मलिकांनी ठामपणे म्हटलं आहे.

किरीट सोमय्या म्हणतात, ''नवाब मलिक सध्या बोलत आहेत की, "माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत" माझे नवाब मलिकांना एक सांगणे आहे, "जर आपण घोटाळा केला असेल,

पुणे वक्फ बोर्डाचा घोटाळा, जमिन गोंधळात आपले नाव असेल, तर आपल्या घरी सरकारी पाहुणे नाही येणार, आपल्यालाच सरकारचे पाहुणे बनावे लागणार आहे,''

Kirit Somaiya, Nawab Malik
'नमामि इंद्रायणी' म्हणून नदी स्वच्छ होत नाही ; महेश लांडगेंना अजितदादांचा टोमणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर त्यांनी सोमवारी पुन्हा हल्लाबोल केला होता. त्यावरून वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांनी उच्च न्यायालयात मलिकांनी न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका केली होती. त्यानंतर मलिकांनी शुक्रवारी मध्यरात्री टि्वट केलं आहे.

मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) मलिक यांना वानखेडे यांच्याविषयी बोलणार नाही, असे हमीपत्र दिले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मलिकांकडून वानखेडे यांच्याविषयी एकही ट्विट करण्यात आलेले नाही. तसेच त्यांनी बोलण्याचेही टाळले होते. पण रविवारी ट्विटर स्पेसवर आयोजित पत्रकार परिषदेत मलिकांनी वानखेडे यांच्याविषयी भाष्य केले होते.

मलिकांनी दादर येथील चैत्यभूमीवरही वानखेडे यांना उद्देशून वक्तव्य केलं होतं. त्यावरून ज्ञानदेव वानखेडे यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यामध्ये मलिकांवर न्यायालयाचा अवमान केल्याचा दावा करण्यात आला होता. वानखेडे यांच्याविषयी न बोलण्याचे प्रतित्रापत्र न्यायालयात देऊनही त्यांनी वक्तव्य केल्याचे यामध्ये म्हटले होते. त्यावर न्यायालयाने मलिकांना आपली बाजू मांडण्यास सांगितले होते. त्यानुसार मलिकांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यावर शुक्रवारी न्यायालयात सुनावणी झाली.

''मी फक्त सरकारी सेवक पदाच्या अधिकारात वक्तव्य केली. मी वानखेडे यांच्याविषयी कोणतीही व्यक्तिगत विधाने केलेली नाहीत. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्याबद्दल बिनशर्त माफी मागतो आणि यापुढे विधाने करणार नाही, अशी हमी देतो,'' अशी बाजू मलिकांच्यावतीने त्यांच्या वकीलांनी मांडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in