'शूट अॅट साईट'वर सोमय्यांची अळीमिळी गुपचिळी!

आपल्यावर आतापर्यंत तीनवेळा हल्ला झाल्याचे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. याची केंद्रीय गृह मंत्रालयाने गंभीर दखल घेतली असून ठाकरे सरकारला ताकीद दिल्याचेही त्यांनी सांगितले.
Kirit Somaiya
Kirit Somaiya Sarkarnama

मुंबई : आपल्यावर आतापर्यंत तीनवेळा हल्ला झाल्याचे भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी म्हटले आहे. याची केंद्रीय गृह मंत्रालयाने गंभीर दखल घेतली असून ठाकरे सरकारला ताकीद दिल्याचेही त्यांनी सांगितले. पुन्हा हल्ला झाल्यास कायदेशीर कारवाईही करू, असं इशाराही देण्यात आला असल्याचे सोमय्यांचे म्हणणे आहे. पण हल्लेखोरांवर जागेवर गोळ्या घालण्याच्या आदेशावर मात्र त्यांनी अळीमिळी गुपचिळी साधली आहे.

सीआयएसएफच्या (CISF) कमांडो विभागाने सोमय्यांवर हल्ल्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज मागितले आहे. तसेच सीआयएसएफच्या कमांडर यांनी मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा केली असल्याची माहिती मिळत आहे. या चर्चेनंतर आता किरीट सोमय्यांवर पुन्हा हल्ला झाल्यास हल्लेखोरांविरोधात शूट अॅट साईट अर्थात जागेवर गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Kirit Somaiya
राजकारण तापलं; सोमय्यांच्या नावाने बनावट एफआयआर

किरीट सोमय्या मात्र यावर थेट बोलत नाहीत. हल्ल्याची गृह विभागाने गंभीर दखल घेतल्याचेच ते सांगतात. पण शूट अॅट साईटचे आदेश दिले किंवा नाही, याबाबत मात्र त्यांचे मौन आहे. त्यामुळे या आदेशावरून आता संभ्रम निर्माण झाला आहे. अद्याप याबाबतचा अधिकृत आदेश समोर आलेला नाही. याबाबत 'साम'शी बोलताना सोमय्या यांनी 'उद्धव ठाकरे, सीआयएसएफ आणि गृहमंत्रालयाला माहीत!' एवढंच सांगितलं.

किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी (२३ एप्रिल) दुसऱ्यांदा हल्ला झाला. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना अटक झाल्यानंतर त्यांना भेटायला गेले असता खास पोलिस स्टेशनजवळ किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांच्या गाडीची काच फुटली असून त्यांच्या हनुवटीला दुखापत झाली आहे. दरम्यान हल्ल्यानंतर बोलताना हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे.

Kirit Somaiya
एलॉन मस्क बनले ट्विटरचे मालक अन् पराग अग्रवालांची चिंता वाढली!

सोमय्या यांच्यावर यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या आवारात देखील हल्ला झाला होता. फेब्रुवारी महिन्यात पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करणासाठी सोमय्या पुणे महापालिकेत गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर पहिल्यांदा हल्ला झाला होता. त्यावेळी त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. हा हल्ला देखील शिवसैनिकांनीच केल्याचा दावा सोमय्यांनी केला होता. दरम्यान दोन वेळा झालेल्या या हल्ल्यांनंतर CISF वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com