Kirit Somaiya यांच्या रडारवर आता पालिकेतील भ्रष्ट अधिकारी अन् बिल्डर ; मुख्यमंत्र्यांना पत्र

Kirit Somaiya : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Kirit Somaiya
Kirit SomaiyaSarkarnama

मुंबई : नोएडामधील अनधिकृत टॉवर्सवर काल (रविवारी) कारवाई करण्यात आली. त्यानंतर भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya)यांनी शिवसेनेचे नेते, माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचा दापोली येथील बंगला अशाच प्रकारे पाडण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. आज (सोमवारी) सोमय्यांनी मुंबईतील अनधिकृत टॉवर्सचा मुद्दा उपस्थित केला आहे. मुंबईत ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Kirit Somaiya latest news)

मुंबईतील बिल्डर आणि महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी यांचं विशेष ऑडिट करण्याची मागणी सोमय्यांनी पत्रकार परिषदेत केली. सोमय्या यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

"मुंबईत असे शेकडो टॉवर्स आहेत ज्यांना अद्याप भोगवटा प्रमाणपत्र (OC) ओसी मिळालेली नाही. पाच- पाच, दहा – दहा वर्षांपासून मध्यमवर्गीय राहत आहेत. मुंबईत असे अनेक टॉवर्स आहे ज्याचे वरचे दोन मजले चार मजले पाच मजले बिल्डर्सने अनधिकृतपणे बांधले आहेत. अजूनपर्यंत वापर परवाना ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळाले नाही. 25 हजारांहून अधिक प्लॅट धारक ओसे नाही म्हणून चिंतेत आहेत. ते बिल्डर आणि महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी यांचे स्पेशल ऑडिट करावे,"असे सोमय्या म्हणाले.

Kirit Somaiya
Supriya Sule : बारामती सगळ्यांनाच हवीहवीशी आहे, निर्मला सीतारामन यांचे मी स्वागत करेन !

सोमय्या म्हणाले, “मुंबई आणि एमआरआरमधील अशा प्रकारच्या अनधिकृत टॉवर, मजल्यांचं विशेष ऑडिट करण्याचे आदेश द्या. महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी, बिल्डर्स यांच्यावर कारवाई करा. २५ हजाराहून अधिक मध्यमवर्गीय सदनिकाधारकांचं रक्षण करा अशी मागणी मी शिंदे आणि फडणवीस यांच्याकडे केली आहे,”

“मध्यमवर्गीय गाळेधारक आणि फ्लॅटधारक यांचं संरक्षण झालंच पाहिजे, यासाठी माझं एकनाथ शिंदे, फडणवीसांना आवाहन आहे. ठराविका बिल्डरला, फ्लॅटधारकांना माफी, असा भेदभाव करु नये,” असंही सोमय्यांनी यावेळी सांगितलं.

“गेल्या वर्षी गणेशोत्सवात मला विसर्जनाला जाताना थांबवण्यात आलं होतं. कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनाला जाता येणार नाही असा आदेश देण्यात आला होता. १९ सप्टेंबरला इथेच थांबवलं होतं. सीएसएमटी स्थानकावरुन ट्रेन पकडून द्यायची नाही असा आदेश तत्कालीन गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी दिले होते. कारण मी हसन मुश्रीफ यांचा घोटाळा बाहेर काढण्यासाठी चाललो होतो. मी न्यायालयात गेलो असता पोलीस प्राधिकारणाने सरकारने किरीट सोमय्यांची अडवणूक केली ती बेकायदेशीर होती असा आदेश दिला आहे. मुंबई पोलिसांनी जाहीरपणे माझी माफी मागितली आहे,” असे सोमय्या म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in