Kirit Somaiya : टि्वन टॉवर पाडल्यानंतर सरनाईकांच्या विहंग इमारतीबाबत सोमय्या म्हणाले..

Kirit Somaiya : सरनाईक यांची विहंग इमारत ही अनाधिकृत असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.
Kirit Somaiya, Pratap Sarnaik
Kirit Somaiya, Pratap Sarnaiksarkarnama

मुंबई : उत्तर प्रदेशच्या (Uttar Paradesh) नोएडामधील (Noida) टि्वन टॉवरबाबत (Twin Tower ) बराच वाद सुरु होता. या टॉवरच्या उभारणीत मोठा भ्रष्टाचार झाला होता आणि मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं. अखेर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर काल (28 ऑगस्ट) शक्तीशाली स्फोट करुन दोन्ही महाकाय इमारती या नियंत्रित पद्धतीने पाडण्यात आल्या. या पाडकामानंतर एक प्रकारे भ्रष्टाचाराला मूठमाती दिली गेल्याची चर्चा देशात रंगली आहे. (Kirit Somaiya news update)

टि्वन टॉवरवरील कारवाईनंतर भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनधिकृत बांधकामाचा मुद्या उचलून धरला आहे. आज पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी मुंबई महापालिका हद्दीतील अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांच्या इमारतीबाबत त्यांना विचारले असता त्यांनी स्पष्टीकरण दिले.

Kirit Somaiya, Pratap Sarnaik
Kirit Somaiya यांच्या रडारवर आता पालिकेतील भ्रष्ट अधिकारी अन् बिल्डर ; मुख्यमंत्र्यांना पत्र

सरनाईक हे आघाडी सरकारमध्ये असताना सोमय्यांनी त्यांच्याविरोधात रान उठवले होते. सरनाईक यांची विहंग इमारत ही अनाधिकृत असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. आता सरनाईक हे शिंदे गटात भाजपसोबत असल्याने सोमय्यांनी सरनाईक यांच्यावर टीका करणे बंद केले आहे.

प्रताप सरनाईक यांच्या विहंग इमारतीसंबंधीत आरोपांवर बोलताना सोमय्या म्हणाले, "मला कोणत्याही एका बिल्डरचं नाव घ्यायचं नाही. पण ही गोष्ट खरी आहे की, 2010 मध्ये लोक राहायला गेले, पण 2022 पर्यंत ओसी मिळाली नव्हती. मी विषय उचलल्यानंतर दंड ठोठावण्यात आला होता, जो मागील सरकारने माफ केला. आता विहंग गार्डनच्या लोकांना ओसी मिळाली आहे,"

मुंबईतील बिल्डर आणि महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी यांचं विशेष ऑडिट करण्याची मागणी सोमय्यांनी पत्रकार परिषदेत केली. सोमय्या यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

"मुंबईत असे शेकडो टॉवर्स आहेत ज्यांना अद्याप भोगवटा प्रमाणपत्र (OC) ओसी मिळालेली नाही. पाच- पाच, दहा – दहा वर्षांपासून मध्यमवर्गीय राहत आहेत. मुंबईत असे अनेक टॉवर्स आहे ज्याचे वरचे दोन मजले चार मजले पाच मजले बिल्डर्सने अनधिकृतपणे बांधले आहेत. अजूनपर्यंत वापर परवाना ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळाले नाही. 25 हजारांहून अधिक प्लॅट धारक ओसी नाही म्हणून चिंतेत आहेत. ते बिल्डर आणि महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी यांचे स्पेशल ऑडिट करावे,"असे सोमय्या म्हणाले.

सोमय्या म्हणाले, “मुंबई आणि एमआरआरमधील अशा प्रकारच्या अनधिकृत टॉवर, मजल्यांचं विशेष ऑडिट करण्याचे आदेश द्या. महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी, बिल्डर्स यांच्यावर कारवाई करा. २५ हजाराहून अधिक मध्यमवर्गीय सदनिकाधारकांचं रक्षण करा अशी मागणी मी शिंदे आणि फडणवीस यांच्याकडे केली आहे,”

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com