हजारो कोटींच्या मालमत्तांवर 'प्राप्तिकर'ची टाच अन् सोमय्यांकडून यादीच जाहीर

हजारो कोटींची मालमत्ता प्राप्तिकर विभागाने जप्त केली आहे, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली.
 Kirit Somaiya
Kirit Somaiyasarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटवर्तींयावर मागील 19 दिवसांपासून प्राप्तिकर विभाग (IT) आणि सक्त वसुली संचालनालयाचे (ED) छापे सुरू आहेत. या प्रकरणी हजारो कोटींची मालमत्ता प्राप्तिकर विभागाने जप्त केली आहे, अशी माहिती भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज दिली.

सोमय्या म्हणाले की, अजित पवार यांच्याशी निगडित मालमत्तांवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. यात जरंडेश्वर शुगर फॅक्टरी 600 कोटी रुपये, दिल्लीतील घर 20 कोटी रुपये, पार्थ पवार यांचे नरिमन पॉईंट येथील कार्यालय 25 कोटी रुपये, गोवा येथील रिसॉर्ट 250 कोटी रुपये या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्‍यांनी दिले आहेत.

प्राप्तिकर विभागने जप्त केलेल्या संपत्तीचे मालक स्वतः अजित पवार, पत्नी सुनेत्रा पवार, अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार, पुत्र पार्थ पवार त्यांच्या दोन्ही बहिणी विजया पाटील आणि निता पाटील आणि जावई हे आहेत. यामध्ये त्यांचे दोन बांधकाम व्यावसायिक मित्रही आहेत. यावर ईडी आणि आयकर विभागाची कारवाई सुरू आहे, असेही सोमय्यांनी सांगितले.

 Kirit Somaiya
शेतकरी जिंकले! हरियानात भाजपला दे धक्का

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊन दोन वर्षे झाली तरी ते भाजपला अद्याप घालवता आलेले नाही. ही घालमेल भाजपला लपवता आलेली नाही. शिवसेनेतील अनेक नेते केंद्रीय यंत्रणांच्या कार्यालयांचे उंबरे झिजवत आहेत. तरीही शिवसेना अद्याप या दबावाला बळी पडल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आता हा मोर्चा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे वळविल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हसन मुश्रीफ आणि त्यानंतर अजित पवार अशा दोन्ही नेत्यांवर सोमय्या यांनी आरोप केले होते. त्यातील पवार यांना लगेच छापेमारीला सामोरे जावे लागले आहे. मुश्रीफ यांना विधानसभा निवडणुकीच्या आधीच अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. तेव्हा त्यांच्या कागल येथील घरावर केंद्रीय यंत्रणांनी तपासणी केली होती.

 Kirit Somaiya
काँग्रेसनं भाजपला अस्मान दाखवलं! मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच चारली धूळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासून नौटंकी करीत आहेत. परमबीरसिंह आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्यांनीच लपवले होते. मागील दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी राज्याला लुटले आहे. हे सर्व जण राज्याला मूर्ख बनवण्याचे काम करीत आहेत. मुद्द्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी ते वेगवेगळे विषय समोर आणत आहेत पण जनता मूर्ख नाही, असेही सोमय्या यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com