मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्याला सोमय्यांनी आणले अडचणीत

किरीट सोमय्या यांचे यशवंत जाधव यांच्यावर गंभीर आरोप
Kirit Somaiya
Kirit Somaiya sarkarnama

मुंबई : मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांनी बनावट कंपन्यांच्या माध्यमातून १५ कोटींचा घोटाळा केला, असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला. या घोटाळ्याची अंमलबजावणी संचालनालय व आयकर खात्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केला.

Kirit Somaiya
राष्ट्रवादीत प्रवेश करताच काँग्रेसचे नेते म्हणाले ‘यूपीएचे नेतृत्व शरद पवारांनी करावे’

भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार मनीषा चौधरी यावेळी उपस्थित होत्या. कोरोना काळात मुंबई महापालिकेने महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संबंधित कंपनीला कोरोना उपचार केंद्र चालविण्याचे कंत्राट दिले गेले, असल्याचे उघड झाले असून या काळात दिलेल्या कंत्राटांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावे, अशी मागणीही सोमय्या यांनी केली.

या वेळी सोमय्या यांनी यावेळी यशवंत जाधव आणि यामिनी जाधव व कुटुंबियांच्या खात्यात प्रधान डीलर्स या कंपनीच्या खात्यातून १५ कोटी रुपये कसे पाठवण्यात आले याचा तपशील सादर केला. ते म्हणाले की, प्रधान डीलर्स की कंपनी बोगस (शेल कंपनी) असल्याचे केंद्रीय कॉर्पोरेट मंत्रालय, अंमलबजावणी संचालनालय व आयकर खात्याने जाहीर केले आहे. अशा बोगस कंपनीचे शेअर्स ५०० रुपये प्रती शेअर खरेदी केल्याचे दाखवून जाधव कुटुंबियांच्या खात्यात १५ कोटी रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे.

Kirit Somaiya
कॉंग्रेससह राष्ट्रवादीचाही शिवसेनेला धक्का; राऊतांच्या घोषणेला केराची टोपली

या व्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी आपण आयकर विभागाकडे तसेच अंमलबजावणी संचालनालयाकडे केली असल्याचेही त्यांनी नमूद केले. महापौर किशोरी पेडणेकर भागीदार असलेल्या किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीला वरळी येथे कोरोना उपचार केंद्र चालविण्याचे कंत्राट दिले गेले. कोरोना उपचार केंद्रांच्या माध्यमातूनही मोठ्या रकमांचे गैरव्यवहार झाले, असल्याने या कंत्राटांचे फॉरेन्सिक ऑडिट व्हावे, अशी मागणीही सोमय्या यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in