आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील कोरोना सेंटरमध्ये गैरव्यव्हार!

वरळीतील कोरोना सेंटरचे काम मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या मुलाच्या कंपनीला दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील कोरोना सेंटरमध्ये गैरव्यव्हार!
Uddhav Thackeray, Kirit Somaiyasarkarnama

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील कोरोना (Corona) सेंटर उभारणीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. वरळीतील कोरोना सेंटरचे काम मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मुलाच्या कंपनीला दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. कंत्राट मिळाल्यानंतर कंपनी तयार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पेडणेकर यांना खुले आव्हान दिले.

Uddhav Thackeray, Kirit Somaiya
परबांच्या आदेशानंतर प्रा. सावंत शिवसेनेत पुन्हा सक्रीय : पक्ष सोपवणार मोठी जबाबदारी!

सोमय्या मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुंबईतील १० कोरोना सेंटरचे फॉरेन्सिक ऑडिट करुन दाखवावे असे आव्हान उद्धव ठाकरे यांना दिले आहे. ते म्हणाले की, 'मी उद्धव ठाकरेंना आव्हान देतो, हिंमत असेल तर मुंबईतील सहा कोरोना सेंटरचे फॉरेन्सिक ऑडिट करुन दाखवावे. मी पुढच्या आठवड्यात मुंबईच्या महापौर आणि कोरोना सेंटरमधील कमाई उघड करणार आहे. शिवसेनेते युवा नेते व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात महापौरांच्या कंपनीला कोरोना सेंटरचे कंत्राट मिळाले आणि हे अपारदर्शक पद्धतीने दिले आहे, असा आरोप त्यांनी केला.

उद्धव ठाकरेंचा उजवा हात असणाऱ्यालाही अशाच पद्धतीने कंत्राट मिळाले आहे. त्याची कागदपत्रे जनतेसमोर ठेवणार, असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला. त्यामुळे महापालिकेच्या तोंडावर सोमय्या शिवसेनेच्या अडचणी वाढवणार असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना नेत्यांना आणि ठाकरे सरकारसाठी कोरोना हे कमाईचे साधन आहे. म्हणूनच रोज सकाळ-संध्याकाळ लॉकडाउनबद्दल बोलत असतात. दहिसरचे केंद्र सुरु झाले, १ जानेवारीपासून ५०० बेड्सची ऑर्डर दिली. मात्र, एकही रुग्ण दाखल नाही. पेडणेकरांनी किरीट सोमय्याला गांजेबाज, नशेबाज सांगा पण तुमच्या सत्तेच्या घोटाळ्याचा नाद राज्यातील जनता उतरवणार, असे सोमय्या म्हणाले.

Uddhav Thackeray, Kirit Somaiya
पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; देशाला दिली 'वीर बाल दिना'ची भेट

किशोरी पेडणेकरांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी मुलगा साईप्रसाद पेडणेकरच्या क्रिश इंटरप्रायजेसला वरळी येथील कोरोना सेंटरचे कंत्राट मिळाले आहे की नाही हे मान्य करावे. हे कंत्राट अपारदर्शक पद्धतीने दिले का नाही, असा सवाल त्यांनी केला. त्यातून किती कमाई झाली? पेडणेकरांनीच त्या कंपनीची स्थापना केली. म्हणूनच शिवेसना नेत्यांसाठी कोरोना सेंटर कमाईचे साधन आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.