अनिल परब म्हणजे 'चोर मचाये शोर'!

आपल्या पदाचा गैरवापर करून हा रिसॉर्ट बांधला आहे. त्यांच्यावर कारवाई होणारच अशा इशारा सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिला आहे.
Anil Parab, Kirit Somaiya
Anil Parab, Kirit SomaiyaSarkarnama

मुंबई : शिवसेनेचे नेते परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दापोली समुद्र किनाऱ्यावर अनधिकृत, फसवणूक करून ५ स्टार रिसॉर्ट बांधला, आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. त्यानंतर सोमय्या यांनी परब यांच्यावर पुन्हा एकादा निशाणा साधला आहे. घोटाळा सिद्ध केला, तेव्हा आता परब म्हणतात, 'तो मी नव्हेच, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

परब यांनी रिसॉर्ट बांधल्याच्या विरोधात महाराष्ट्र सरकार, पर्यावरण मंत्रालय, रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी हा रिसॉर्ट अनधिकृत असल्याचे सांगितले आहे असे सोमय्या म्हणाले. हा रिसॅार्ट फसवणुकीने बांधण्यात आला आहे, आणि त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्या बांधणाऱ्या व मालकांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश ही देण्यात आल्याचे सोमय्या यांनी सांगितले आहे.

Anil Parab, Kirit Somaiya
गुलाबराव पाटलांना 'ते' वक्तव्य भोवणार! महिला आयोगानं दिला थेट इशारा

अनिल परब यांनी २ मे २०१७ रोजी १ कोटी रुपये देऊन विभास साठे यांच्याकडून शेत जमीन विकत घेतली, त्याच दिवशी त्या जागेचा ताबा घेतला, असे ही करारात म्हटल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. सप्टेंबर २०१७ नंतर ह्या जागेवर बांधकाम सुरु झाले. परब यांनी विभास साठे यांच्याकडून समुद्र किनाऱ्यावरील ही जागा गाव मुरुड गट क्र. ४४६ ची ४, २०० स्के.मी. ही शेत जमीन म्हणून विकत घेतली. असे खरेदी करार, रजिस्ट्रेशन १९ जून २०१९ रोजी केले. हा करार १९ जून २०१९ रोजी रजिस्टर झाला. जागेचा कब्जा हा मे २०१७ मध्ये अनिल परब यांनी विभास साठे यांच्याकडून घेतला, ही जागा शेत जमीन आहे, असे ही खरेदीखतात स्पष्टपणे म्हटले, त्याच्यावरील स्टॅम्प ड्यूटी सुद्धा (शेत जमिनिनीची) भरण्यात आली, असा दावा सोमय्या यांनी केला आहे.

अवघ्या ७ दिवसानंतर २६ जून २०१९ रोजी परब यांनी ग्रामपंचायत ला पत्र दिले, आम्ही केलेल्या खरेदीखताप्रमाणे या जागेवरील जे १७, ८०० स्के. फि. व्यवसायिक बांधकाम (रिसॉर्ट) आहे. तो साठे यांच्या नावाने ग्रामपंचायत मध्ये रजिस्टर आहे. तो आता माझ्या नावाने करा. या जागेवरील २०१९-२० रिसॉर्टची म्हणजेच व्यावसायिक बांधकामाची घरपट्टी (property tax) ही नोव्हेंबर २०१९ मध्ये परब यांनी ग्रामपंचायतला स्वत:च्या नावाने स्वत:च्या बँक खात्यातून भरला, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

परब यांनी महावितरणकडे रिसॉर्टसाठी ३ फेज वीज कनेक्शनसाठी अर्ज केला, स्वत:च्या खात्यातून पैसे भरले. सोमय्या म्हणाले, मी परब यांचा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर त्यांनी २९ डिसेंबर २०२० रोजी त्यांचे व्यावसायिक मित्र सदानंद कदम यांच्याशी खरेदी करार केला. शेत जमीन म्हणून गट क्र. ४४६, ४, २०० स्के. मी. ही जागा कदम यांना विकण्याचा खरेदीकरार केला. २१ मार्च २०२१ रोजी ही जागा शेत जमीन म्हणून ठाकरे सरकारने सदानंद कदम यांच्या नावाने केल्यादा दावा सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांच्या तक्रारीनंतर केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याच्या अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी केली. हे बांधकाम CRZ ना बांधकाम क्षेत्रात (No Development Zone) असल्यामुळे याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले.

Anil Parab, Kirit Somaiya
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते; भाजपचा आरोप

राज्यपालांनी या घोटाळ्याची चौकशी करण्याचे लोकायुक्तांना निर्देश दिले. लोकायुक्तांसमोर महाराष्ट्र सरकारने हा रिसॉर्ट फसवणुकीने बांधण्यात आल्याचे, फोर्जरी झाली असल्याचे मान्य केले. लोकायुक्तांनी आता परब यांना पण नोटीस पाठविली आहे. चेन्नई येथील केंद्र सरकारच्या इन्स्टिट्यूटने स्पष्टपणे सांगितले आहे की, २०१७ पर्यंत ही जागा शेत जमीन होती. कोणतेही बांधकाम नव्हते. नोव्हेंबर २०१७ पासून बांधकाम सुरु झाले. जानेवारी २०२१ मध्ये रिसॉर्टचे बांधकाम पूर्ण झाले असा त्यांचा अहवाल ही आला असल्याचे सोमय्या यांनी प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे. परब यांनी फसवणुकीने, फोर्जरी करून, आपल्या पदाचा गैरवापर करून हा रिसॉर्ट बांधला आहे. त्यांच्यावर कारवाई होणारच अशा इशारा सोमय्या यांनी पुन्हा एकदा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com