Girish Mahajan: '' खडसेसाहेब..रेती,हप्त्यावर बोलू नका, आम्ही तोंड उघडले तर...'' ; गिरीश महाजनांचा इशारा

Girish Mahajan: ...त्यामुळे एकनाथ खडसेंनी बोलत असताना विचार केला पाहिजे.
Girish Mahajan,Eknath Khadse
Girish Mahajan,Eknath Khadse Sarkarnama

कैलास शिंदे

जळगाव : एकनाथ खडसे रेती,हप्ते यावर बोलायला लागले आहेत हे विशेष आहे. जळगाव जिल्ह्यात रेती,हप्ते कोण घेतो? हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे त्यांनी अधिक बोलू नये, आम्ही जर तोंड उघडले तर अनेक विषय पुढे येतील असा हल्लाबोल राज्याचे ग्रामविकास मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खडसेंवर केला आहे.

भाजप नेते गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. महाजन म्हणाले, विधिमंडळात एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील अवैध धंदे, रेती,हप्तेखोरी यावर सरकारवर चांगलेच आसूड ओढले होते. (Bjp leader Girish Mahajan's warning to Ncp'S Eknath Khadse)

Girish Mahajan,Eknath Khadse
Atal Bihari Vajpayee Birth Anniversary : 'सरकारे येतील आणि जातील पण लोकशाही टिकली पाहिजे...' अटलबिहारी वाजपेयी असं का म्हणाले होते?

मंत्री गिरीश महाजन म्हणाले, एकनाथ खडसेसाहेब यांनी रेती,हप्ते यावर बोलायला लागले आहेत. मी त्यावेळी सभागृहात नव्हतो, मला उत्तर देण्याचा अधिकार नाही. पण खंडणी, हप्ते वसुली, रेती हे सर्व उद्योग कोणाचे आहेत,कोण काय करतो जिल्ह्यात हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे त्यांनी बोलत असताना तेवढा विचार केला पाहिजे. लोकांना आता सर्व कळायला लागले आहे.

Girish Mahajan,Eknath Khadse
'' संजय राऊतांनी आधी त्यांचे चालक पालक उध्दव ठाकरेंनी कोणत्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला, ते सांगावं!''

आम्ही जातीवाचक बोलणारे पीआय बकाले यांना पाठीशी घालत आहोत हा एकनाथ खडसे यांचा आरोप चुकीचा आहे. कुणीही बकाले यांना पाठीशी घालत नाही. उलट आम्ही तर त्यांना समोर आणा अशी मागणी पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे. याच बकाले ना कोणी आणले,ते कोणाचे पिल्लू आहे,हे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे लोकांना सर्व कळत आहे. आम्ही जर तोंड उघडले, आम्ही बोललो तर अनेक विषय पुढे येतील असा इशाराही महाजन यांनी खडसेंना दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com