भाजप नेत्याकडून अमरावतीत दंगली भडकवण्यासाठी पैसे वाटप

राज्यातील जनतेने हे षडयंत्र ओळखून शांतता राखल्याबद्दल त्यांचे आभार
भाजप नेत्याकडून अमरावतीत दंगली भडकवण्यासाठी पैसे वाटप

मुंबई : अमरावतीतील (Amarawati) दंगली, हिंसाचार सुनियोजित कट असल्याचा आरोप राष्ट्र्वादी कॉंग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केल आहे. 'मुस्लिम संघटनानी अमरावतीत काढलेल्या मोर्च्यात दंगली भडकल्या. या दंगली भडकवण्याचे षडयंत्र भाजपचे माजी आमदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी रचले होते. या दंगली भडकवण्यासाठी त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांद्वारे काही समाजकंटकांना पैसे वाटण्यात आले, दारूचे आमिष दाखण्यात आले, असा धक्कादायक खुलासा नवाब मलिक यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अमरावती हिंसाचाराबाबत आणखी धक्कादायक खुलासे केले आहेत. याप्रकरणी बोलताना नवाब मलिक यांनी आणखी धक्कादायक खुलासे केले आहेत. भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना 2 तारखेच्या रात्री डांगे भडकावण्याचा कट रचला. दंगली भडकवण्यासाठी मुंबईहून पैसे पाठवण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. अमरावतीच नव्हे तर संपुर्ण राज्यभरात भाजपकडून दंगली भडकवण्याचे षडयंत्र भाजपने रचले होते. पण राज्यातील जनतेने त्यांच्या षडयंत्राला बळी न पडता शांतता राखल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

असे नकारात्मक राजकारण राज्यात चालणार नाही. देशभरात भाजपचे सरकार नसलेल्या राज्यात सत्ता उखूडन फेकण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आमदार फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे. आमदारांना विकत घेऊन, त्यांना धमकावून, केंद्रीय तपास यंत्रणांची भिती दाखवून आमदारांना विकत घेण्याचे काम सुरु आहे, ३०-४० कोटी रुपये देऊन राज्यात आमदार विकत घेतले जात आहेत. गोवा, पश्चिम बंगाल, कर्नाटक मध्येही असेच प्रयत्न करण्यात आले.पण तुम्ही पैशांद्वारे विकत घेऊ शकत नाही, हे सरकार शिवाजी महाराजांच्‍या प्रेरणेतून सुरू आहे, महाराष्ट्र दिल्‍लीपुढे झुकणार नाही, आम्ही 5 वर्ष पूर्ण करणार, असा विश्वास यावेळी नवाब मलिकांनी व्यक्त केला.

भाजप नेत्याकडून अमरावतीत दंगली भडकवण्यासाठी पैसे वाटप
बाळासाहेबांची शिवसेना खऱ्या अर्थाने संपली; नितेश राणेंचा घणाघात

पोलीसांनी केलेल्या तपासात अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. ज्यांनी समाजात दंगली भडकल्या त्यांच्या विरोधात पोलीसांनी एफआयआर दाखल करुन त्यांना अटक करण्याचे काम सुरु झाले आहे. भाजपकडून दंगली भडकावून राजकारण करत आहे. पण राज्याची जनता जाणकार आहे, अशा कारस्थानांना राज्याची जनता स्विकारणार नाही.

दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी नवाब मलिकांना उत्तर दिलं आहे. 'रझा अकादमीच्या नेत्यांना आणि अध्यक्षांना कोण किती वेळा भेटल याचा काय संबंध, असा सवाल त्यांनी केला आहे. २०१६ मध्ये झालेल्या भेटीचा २०२१ मध्ये होणाऱ्या दंगलीशी काय संबंध ? असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी महाविकास आघाडीला लगावला. सरकार तुमचं आहे जे कोणी दोषी असतील त्यावर कारवाई करा, कोण कोणाला भेटलं यावर बोलून उगाच विषय भरकटवण्याचा हा प्रयत्न आहे. असेही आशिष शेलारांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.