हनुमान चालीसा महाराष्ट्रात नाही तर पाकिस्तानात म्हणायची का ?

देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या पत्रकार परिषदेत हनुमान चालीसा म्हणून दाखवली.
devendra fadnavis
devendra fadnavissarkarnama

मुंबई : मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाचण्यावरुन राज्यात शिवसेना (Shivsena) विरुद्ध राणा दांपत्य असा संघर्ष पेटला,त्यामुळे दोन दिवस मुंबईत मोठा राडा झाला. हनुमान चालीसावरुन राजकारण रंगलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या पत्रकार परिषदेत हनुमान चालीसा म्हणून दाखवली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीयमंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

'मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालीसा म्हणण्यासाठी येणाऱ्या खासदार नवनीत राणा यांचा किती व्देष करायचा. मुळात हा राजद्रोह कसा होऊ शकतो? तो राजद्रोह असेल तर आम्ही रोज हनुमान चालिसा म्हणू.आमच्यापैकी प्रत्येक जण हा राजद्रोह करण्यासाठी तयार आहे, हनुमान चालिसा महाराष्ट्रात नाही तर पाकिस्तानात म्हणायची?' असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला.

devendra fadnavis
मुंबईत जे घडतयं ते मुख्यमंत्र्यांच्याच इशाऱ्यावर ; फडणवीसांचा हल्लाबोल

शिवसेनाविरुद्ध नवनीत राणा, किरीट सोमय्यांवर हल्ला, भोंग्याबाबतची भूमिका या मुद्यांवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणीस (devendra fadnavis)यांनी उद्धव ठाकरे यांचा आज समाचार घेतला. फडणवीसांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर ताशेरे ओढले.

''सध्या मुंबईत जे सुरु आहे. ते मुख्यमंत्री ठाकरे यांच्या इशारावर सुरु आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रात जे सुरु आहे, ते गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या इशाऱ्यावर सुरु आहे.खासदार नवनीत राणे यांनी मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणण्याचा निर्धार केला होता. हनुमान चालीसा महाराष्टात नाही तर पाकिस्तानमध्ये म्हणायचे का? असा सवाल फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

devendra fadnavis
राजकारण हा आजार असेल तर त्याचं मूळ 'मातोश्री' ; सदाभाऊंचा मुख्यमंत्र्यांना टोला

''मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर राणा दाम्पत्य हे हनुमान चालीसा म्हणणार होते, ते आंदोलन, किंवा हल्ला करणार नव्हते, त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला, हनुमान चालीसा म्हणणं हा राजद्रोह असेल तर आम्ही रोज म्हणू, आमच्यापैकी प्रत्येक जण हा राजद्रोह करण्यासाठी तयार आहे,'' असा इशारा फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

''मुख्यमंत्र्यांना लोकशाही मान्य नाही, त्यांनी आमच्या पोलखोल सभांवर हल्ला केला, असे हल्ले करून आम्ही घाबरणार नाही, हे लक्षात ठेवावं. झेड सेक्युरिटीमधील आमच्या नेत्यांना त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला. ठाकरे सरकारने विरोधी पक्षाला जिवानिशी संपवायचं ठरवलयं. जिथे गुन्हा नोंद करायला ही संघर्ष करावा लागत आहे.आतापर्यंत महाराष्ट्रात अशी परिस्थिती पाहिली नव्हती,'' असे फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com