उद्धव ठाकरे आणि अमृतामध्ये एक साम्य..! फडणवीसांनी दोघांनाही सुनावलं

दोन दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना ट्विटरवरून टोला लगावला होता. त्यावरून फडणवीस यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना याबाबत विधान केलं.
Amruta Fadnavis, Uddhav Thackeray
Amruta Fadnavis, Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्नी अमृता आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात एक साम्य असल्याचे सांगितले. तसेच यावेळी त्यांनी दोघांनाही खडेबोल सुनावले. दोन दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना ट्विटरवरून टोला लगावला होता. त्यावरून फडणवीस यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना याबाबत विधान केलं.

फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी पत्नी अमृता (Amruta Fadnavis) यांच्यात एक साम्य आहे. उद्धवजी टोमणे मारणं सोडत नाहीत आणि माझी पत्नी नको त्या गोष्टीला उत्तर देणं सोडत नाही. उद्धवजींनी मुख्यमंत्री म्हणून आपली पातळी वर ठेवली पाहिजे. अशाप्रकारचं काही आल्यानंतर माझ्या पत्नीनेही त्याला उत्तर देण्याचं काही कारण नाही. अशा गोष्टी सोडून द्यायला हव्यात. अर्थात हा त्या दोघांचा प्रश्न आहे. त्यावर मी अधिक बोलणार नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Amruta Fadnavis, Uddhav Thackeray
...तर मी तात्या टोपे आणि झाशीच्या राणीसोबत लढत असेन! फडणवीसांचा ठाकरेंना टोला

काय घडलं होतं?

अमृता फडणवीस यांनी दोन मे रोजी एक ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. या ट्विटमध्ये त्यांनी एका बातमीचा फोटो टाकला होता. या बातमीमध्ये म्हटले होते की, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे चांगलं गातात असं मला आदित्यने सांगितलं होतं. मला हा धक्का होता. कारण मला वाटलं आजपर्यंत फक्त एकच व्यक्ती गाते, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला होता.

उद्धव ठाकरेंच्या या विधानावर अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून टोला लगावला होता. त्या म्हणाल्या होत्या की, 'मला सुद्धा धक्का होता, मला वाटलं होतं, अबजाधीश फक्तं आपणच आहात, आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा आब्जाधीशच आहे! छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा कुटुंबात.' यावरून देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी प्रश्न विचारला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com