युक्रेनचे अध्यक्ष ठाकरेंची मदत घेणार; त्यांच्याकडे शक्तीशाली टोमणा बॉम्ब आहे

Uddhav Thackeray|Devendra Fadnavis|BJP|MahavikasAghadi: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
CM Uddhav Thackeray & Devendra Fadnavis
CM Uddhav Thackeray & Devendra Fadnavis sarkarnama

मुंबई : भाजप (BJP) नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) काल (ता. 24 मार्च) ठाकरे सरकारवर (Maharashtra Government) केलेल्या आरोपांचा आज (ता.25 मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणातून समाचार घेतला. यावर फडणवीसांनी लगेचच मुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी जे आम्ही विचारले त्या अनेक प्रश्नांना उत्तर दिलेच नाही. युक्रेनने नाटो ऐवजी मुख्यमंत्री ठाकरेंकडे मदत मागायला हवी होती. कारण आमच्या मुख्यमंत्र्याकडे टोमने बॉम्ब आहे, अश्या शब्दात फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.

CM Uddhav Thackeray & Devendra Fadnavis
मराठा आरक्षणाचा वापर केवळ सरकारविरोधात वातावरण निर्मितीसाठी...

अधिवेशन संपल्यावर फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. फडणवीस म्हणाले, कुठल्याही विषयाला हे सरकार उत्तर देऊ शकले नाही. आम्ही भ्रष्टाचाराचे मुद्दे मांडले पण सरकारने कुठलेही उत्तर दिले नाही. महाविकास आघाडीचा कत्तलखाना आम्ही समोर आणला. आमच्या आमदारांबाबत कसे कटकारस्थान करतात हे आम्ही दाखवलं आम्हाला सीआयडी चौकशी मान्य नसून आम्ही CBI चौकशीच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच, विदर्भ आणि मराठा प्रश्नावर बोलताना आम्ही किती पैसे दिले हे विचारले पण त्यांनी त्याचे उत्तर दिले नाही.पहिल्या दिवसापासून आम्ही पाठपुरावा करत होतो. विदर्भ आणि मराठावाडा सबसिडीचे पैसे मागत होतो. मात्र, यांनी काहीच उत्तर दिले नाही. तसेच, पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन करणारे कॉंग्रेस हे दुटप्पी आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी दोन भाषण केले. त्यातील आजचे त्यांचे भाषण हे शिवाजी पार्कवरील भाषण होते. असा जोरदार टोलाही फडणवीसांनी ठाकरेंना लगावला.

CM Uddhav Thackeray & Devendra Fadnavis
'प्रकाश आंबेडकरांनी निवडणुकीत एक हजार कोटी घेतले'

आज स्पष्ट झाले की मुंबई बॉम्ब ब्लास्ट करणाऱ्यांचे ते समर्थन करत आहेत. त्यांचे आजचे भाषण हे संदेश देण्यासाठीचे भाषण होते. युक्रेनने नाटोकडे मदत मागण्यापेक्षा आमच्या मुख्यमंत्र्याची मदत मागायला हवी होती. कारण त्यांच्याकडे टोमणे बॉम्ब आहेत. मात्र, टोमन्यांनी सरकार चालत नाही. आज राज्यात उद्योजक राहायला तयार नाही. तसेच एसटी आंदोलकांबाबत सरकार अहंकारात बुडाले आहे. तुमच्या घरगड्यांना त्रास होतोय, म्हणून तुम्ही ईडीला घरगडी म्हणता का?, असा घणाघातही फडणवीसांनी केला.

फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये यासाठी आम्ही संघर्ष केला आणि तसा निर्णय राज्य सरकारला घ्यावाही लागला. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आम्ही संघर्ष केला. पण दुर्दैव की दाऊदशी व्यवहार करणारे, हसिना पारकरला व्यवहारातून पैसे देणारे आज शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांना जवळची वाटत आहेत. यशवंत जाधव यांनी केलेला भ्रष्टाचार, मुंबई महापालिकेत झालेला गैरव्यवहार या अधिवेशनात उघडा पडला. प्रवीण दरेकर यांच्यावर आकसबुद्धीने कारवाई होते आहे. मात्र, त्याविरोधात न्यायालयात आम्ही संघर्ष करू. पुढच्या 15 दिवसात आम्ही जिल्हा स्तरावर जाऊन कोण कुठून निवडून आले, याची माहिती सांगणार आहे. जनतेचा पैसा आम्ही लुटू देणार नाही. भ्रष्टाचाराविरोधात आमचा संघर्ष सुरूच राहील. अशी टीका त्यांनी केली.

CM Uddhav Thackeray & Devendra Fadnavis
गिरीश महाजन मुख्यमंत्री कधी होणार हे सांगताना अजितदादांचा मुनगंटीवारांना चिमटा!

जेव्हा उत्तर देता येत नाही, तेव्हा भावनात्मक भाषण करून दिशाभूल केली जाते. तेच काम आज मुख्यमंत्र्यांनी केले आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणूक बाबत तारीख ठरविण्याचा अधिकार 24 राज्यात मुख्यमंत्र्यांकडे नाही. राज्य सरकारकडे 170 आमदार असताना गोपनीय मतदान घेण्याची भीती का वाटते?, असा सवाल उपस्थित करून फडणवीसांनी ठाकरे सरकारला डिवचले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com