राहूल गांधींना स्वांतत्र्यवीर सावरकरांबाबत स देखील माहीत नाही...

Devendra Fadanvis : स्वर्गात बाळासाहेब पाहत असतील, तेव्हा त्यांना काय वाटत असेल?
Rahul Gandhi - Devendra Fadanvis Latest News
Rahul Gandhi - Devendra Fadanvis Latest NewsSarkarnama

मुंबई : स्वांतत्र्यवीर सावरकर हे एकमेव स्वांतत्र्य सेनानी आहेत. त्यांनी स्वांतत्र्यापूर्वीही कारावास भोगला आणि स्वांतत्र्यानंतर उपहासाचा कारावास भोगला. आजही त्यांच्या विचाराला कारावासात टाकण्याचा प्रयत्न काँग्रेस करतंय. काँग्रेसचे नेते सावरकरांबाबत रोज खोट सांगतात. राहूल गांधी तर रोज सावरकरांबाबत खोटं बोलतायेत. काँग्रेस नेते निर्लज्जपणे वागतायेत. पण महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं. ते मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्तच्या आयोजित कार्यक्रमात बोलत होते. (Rahul Gandhi - Devendra Fadanvis Latest News)

Rahul Gandhi - Devendra Fadanvis Latest News
रामटेकचा गड अभेद ठेवण्यासाठी 'मातोश्री'वर 'मोर्चेबांधणी'

फडणवीस म्हणाले, ''आंदमानच्या काल कोठडीमध्ये सावरकर शिक्षा भोगत असतानाही त्यांच्या मनात स्वांतत्र्य लक्ष्मीचीच पूजा होती. त्यांनी स्वांतत्र्य लक्ष्मीचं गीत गायलं. त्यांनी स्वांतत्र्यासाठी लढा दिला. त्यांच्यामुळे कोठडीतही बंड करण्याचं बळ कैद्यांना मिळालं. मात्र अशा नेत्याबाबत काँग्रेस (Congress) नेते काहीही बोलतात. राहूल गांधींना (Rahul Gandhi) स्वांतत्र्यवीर सावरकरांबाबत स देखील माहीत नाही. त्यांना हे कोणीतरी लिहून देतं आणि ते वाचतात. त्यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने उत्तर दिलं पाहिजे'', अशा शब्दात फडणवीसांनी राहूल गांधींवर टीका केली.

Rahul Gandhi - Devendra Fadanvis Latest News
शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा; एसटी कर्मचाऱ्यांना आले 'अच्छे दिन'

ते पुढे म्हणाले, ''हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी राजकारनासाठी कधीही जातीच्या शस्त्राचा वापर केला नाही. स्वांतत्र्यवीर सावरकरांना जसा समाज हवा होता, तसा समाज बाळासाहेबांनी घडवला. स्वांतत्र्यवीर सावरकरांच्या विचाराचा वारसा खऱ्या अर्थाने त्यांनी चालवला. पण आता जे स्वांतत्र्यवीर सावरकरांबाबत काहीही बोलतात त्या राहूल गांधींच्या गळ्यात गळे टाकून भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे चालतात. हे स्वर्गात बाळासाहेब पाहत असतील, तेव्हा त्यांना काय वाटत असेल? असा सवाल करत बाळासाहेब ठाकरेंबाबत नातं सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही, अशा शब्दात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in