स्वतंत्र लढणार, हे संभाजीराजेंच आधीच ठरलं होतं! फडणवीसांनी सांगितलं दोघांच्या भेटीत काय झालं?

शाहू महाराजांनी गौप्यस्फोट केल्यानंतर फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली आहे.
स्वतंत्र लढणार, हे संभाजीराजेंच आधीच ठरलं होतं! फडणवीसांनी सांगितलं दोघांच्या भेटीत काय झालं?
Sambhajiraje Fadnavis and Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi NewsSarkarnama

नागपूर : संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना राज्यसभेची निवडणूक स्वतंत्र लढवणार असल्याची घोषणा त्यांनी आमच्या भेटीआधीच केली होती, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यसभेच्या उमेदवारीबाबत शाहू छत्रपती यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर फडणवीस यांनी दोघांमध्ये झालेल्या चर्चेची माहिती माध्यमांना दिली. (Devendra Fadnavis Latest Marathi News)

नागपूरात माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी काही माणसं ज्याप्रकारे राजकारण करत आहेत ते उघडे पडतील, असा इशारा दिला. ते म्हणाले, केवळ रेकॉर्ड ठीक राहावा म्हणून मी एकच गोष्ट सांगतो, आभार मानण्यासाठी संभाजीराजे भेटले होते. त्याआधीच त्यांनी कोणत्याही पक्षाचे तिकीट घेणार नसल्याची आणि स्वतंत्र उभे राहणार असल्याची घोषणा केली होती.

Sambhajiraje Fadnavis and Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi News
किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रीप्ट तयार करून शाहू महाराजांना दिली! फडणवीसांचा पलटवार

मला भेटले त्यावेळी त्यांनी मला हेच सांगितले. माझी अपेक्षा आहे की आमच्या घराण्याची परंपरा पाहता ज्याप्रकारे मागीलवेळी राष्ट्रपती कोट्यातून भाजपने मला पदावर बसवले. यावेळी सर्व पक्षांनी अपक्ष म्हणून मला पाठिंबा द्यावा, असं ते म्हणाले होते. मी त्याहीवेळी त्यांना सांगितलं की, सर्वपक्ष पाठिंबा देणार असतील तर याबाबत हायकमांडशी जरूर चर्चा करीन. ते माझ्या हातात नाही, असं संभाजीराजेंना सांगितल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

दरम्यान, फडणवीस यांनी यावेळी विरोधकांवर शरसंधान साधले. पश्चिम महाराष्ट्रात संभाजीराजे यांचे नेतृत्व तयार होत आहे. त्याचं नुकसान कुणाला आहे, असं म्हणत फडणवीस यांनी टीका केली आहे. त्यामुळे फडणवीस यांचा रोख नेमका कुणाकडे होता, यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Sambhajiraje Fadnavis and Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi News
शाहू महाराजांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊत थेट कोल्हापूरातील राजवाड्यावर

काय म्हणाले फडणवीस?

शाहू महाराज आमचे छत्रपती आहेत. त्या गादीचा मोठा मान आहे. त्यामुळे त्यांनी कुठलंही मत व्यक्त केलं असलं तरी मी बोलणार नाही. त्यासंदर्भात संभाजीराजेंनी दिलेली प्रतिक्रिया पुरती बोलकी आहे. मला एकाच गोष्टीचं दु:ख आहे की, काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रीप्ट तयार करून आदरणीय महाराजांना चुकीची माहिती दिलेली दिसतेय. अशी माहिती महाराजांना देणाऱ्यांना समत नाही की, एकीकडे अशी माहिती महाराजांना देऊन ते संभाजीराजेंना खोटं ठरवत आहेत, असं फडणवीस म्हणाले.

महाराज आणि युवराजांमध्ये काहीतरी अंतर आहे, असं दाखवण्याचा काम करत आहेत. त्यामुळं असं काम करणाऱ्यांच्या या वागण्याबद्दल मला प्रचंड दु:ख आहे. छत्रपती संभाजीराजे यांचं नेतृत्व गेल्या सहा वर्षात चांगल्याप्रकारे तयार होत आहे. मराठा समाज, बहुजन समाजात एक आपुलकी निर्माण झाली आहे. असं नेतृत्व तयार झाल्यानंतर तेही पश्चिम महाराष्ट्रात तयार झाल्यानंतर त्याचं कुठलंही नुकसान भाजपला नाही. त्यांचं नुकसान कुणाला आहे, हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे हे नेतृत्व तयार होऊ नये, अशाप्रकारचा प्रयत्न कोण करणार हे साधं ज्याला राजकारण समजतं त्यालाही हे समजतं, अशी टीका फडणवीस यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in