'शरद पवारांची भूमिका कधी कुणाला कळलीय का?'

राज ठाकरे यांनी दौरा पुढे ढकलला आहे रद्द केला नाही.
 Sharad Pawar, Devendra  Fadnavis Latest News
Sharad Pawar, Devendra Fadnavis Latest News Sarkarnama

मुंबई : राज्यसभा निवडणुकीमुळे (Rajya Sabha Election) राज्यातील वातावरण सध्या तापलं आहे. शिवसेनेनं (Shivsena) दोन जागा लढवण्याची घोषणा करून मैदानात उडी घेतली आहे. यामुळे राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. दरम्यान संभाजीराजेंच्या (Sambhajiraje) समर्थनावरून भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भूमिका कधी कुणाला कळली आहे का?, असा खोचक टोला लगावला आहे. त्यांनी आज (ता. 20 मे) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

 Sharad Pawar, Devendra  Fadnavis Latest News
बाळासाहेबांनी माझा हात पकडला नसता तर...आठवणीत राऊत भावूक

या वेळी फडणवीसांनी राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यावरही आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राज ठाकरे यांनी दौरा पुढे ढकलला आहे. रद्द केला नाही. ते लवकरच आयोध्येला जातील.आयोध्येला जाणाऱ्यांचे स्वागत करावे ही आमची भूमिका आहे. तसेच, ओबीसी आरक्षण हे भाजपमुळे गेले,अशी सातत्याने टीका करणारे कॅाग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा स्मृतीभंश झाला आहे. याचे कारण ओबीसी आरक्षण आहे. ओबीसी आरक्षण हे उध्दव ठाकरे यांच्या काळातच गेल्याची आठवणही त्यांनी यावेळी पटोलेंना करून दिली.

यावेळी संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीवरुन माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर फडणवीसांनी शरद पवारांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, पवारांची भूमिका कधी कुणाला कळली आहे का?, असा खोचक सवाल करत त्यानी टीका केली. आम्ही संभाजीराजेंना आमच्या कोट्यातून खासदार केले होते. मात्र त्यांना कधीही पक्षाचा प्रचार करायला लावला नाही. संभाजीराजेंना सहावी जागा का देता त्यांना महत्वाची जागा द्यावी, असे म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

 Sharad Pawar, Devendra  Fadnavis Latest News
पवारांकडून ब्राह्मण संघटनांना चर्चेचं निमंत्रण; मिटकरी, केतकी चितळे वादावर तोडगा?

यावेळी फडणवीसांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर जोरजार टीका केली ते म्हणाले की, ' राऊत हे महत्त्वाची व्यक्ती नसून त्यांना कुणी गांभीर्याने घेत नाही. महाविकास आघाडी सरकार हे फक्त ढोलकी वाजविण्यात व्यस्त आहे. ते ट्रिपल टेस्ट का करु शकले नाही, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे, असाही हल्लाबोल फडणवीसांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com