ओबीसी आरक्षणाची पद्धतशीरपणे कत्तल! फडणवीसांकडून तीन दिवसांपूर्वीचा व्हिडीओ ट्विट

ओबीसींच्या आरक्षणाशिवाय दोन आठवड्यात पंचायत निवडणुकांची अधिसूचना काढण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला दिले आहेत.
ओबीसी आरक्षणाची पद्धतशीरपणे कत्तल! फडणवीसांकडून तीन दिवसांपूर्वीचा व्हिडीओ ट्विट
Bjp Leader Devendra Fadanvis Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मंगळवारी मध्य प्रदेश सरकारला दणका दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून आता भाजपला लक्ष्य केलं जात आहे. महाराष्ट्राला अडचणीत आणण्यासाठी भाजपच्याच काही लोकांनी न्यायालयात जाऊन हा खेळ केला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला आहे. तर या निकालानंतर काही वेळातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळातच तीन दिवसांपूर्वीचा एक व्हिडीओ ट्विट करत आघाडीवर निशाणा साधला आहे. (OBC Reservation Latest Marathi News)

भाजपच्या ओबीसी मोर्चा प्रदेश पदाधिकाऱ्यांची मुंबई सात मे रोजी बैठक झाली. या बैठकीत फडणवीस यांनीही मार्गदर्शन केले होते. याच बैठकीतील भाषणाचा व्हिडीओ फडणवीस यांनी ट्विट केला आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले नाही, त्याची पद्धतशीरपणे कत्तल करण्यात आली आहे, असं फडणवीस यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे. मध्य प्रदेश सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिल्यानंतर फडणवीस यांनी काही वेळातच हा तीन दिवसांपूर्वीचा व्हिडीओ ट्विट केला आहे. (Devendra Fadnavis criticizes Mahavukas Aghadi)

Bjp Leader Devendra Fadanvis Latest Marathi News
भाजपने महाराष्ट्रासाठी खोदलेल्या खड्ड्यात संपूर्ण देशातील ओबीसी गेले!

काय म्हणाले आहेत फडणवीस?

मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा ओबीसी आरक्षणाविना होत आहेत. काही निवडणुका झाल्या आहेत. अशाप्रकारची अवस्था महाराष्ट्रात आहे. राजकीय आरक्षण हे गेलं नाही, हा आरक्षणाचा मुडदा पाडला आहे. या आरक्षणाचा खून महाविकास आघाडी सरकारने केला आहे. ज्याप्रकारे एखाद्याची कत्तल पध्दतशीरपणे केली जाते, त्याप्रकारे या आरक्षणाची कत्तल महाविकास आघाडी सरकारने केली आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, ओबीसींच्या आरक्षणाशिवाय दोन आठवड्यात पंचायत निवडणुकांची अधिसूचना काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रानंतर दणका बसलेले मध्य प्रदेश (Madhya Pradesh) दुसरे राज्य ठरले आहे. पण या निकालामुळे आता देशभरातील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आलं आहे. न्यायालयाच्या आजच्या निकालावर बोलताना भुजबळ म्हणाले, देशात कोणत्याही राज्याने ट्रिपल टेस्ट पूर्ण केली नाही. त्यात भाजपची सत्ता असलेली राज्यही आहेत. फक्त महाराष्ट्राला अडचणीत आणण्यासाठी भाजपच्याच काही लोकांनी न्यायालयात जाऊन हा खेळ केला. पण हा देशाला महागात पडला आहे. आमच्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात सगळ्या देशातील ओबीसी गेले आहेत.

Bjp Leader Devendra Fadanvis Latest Marathi News
भाजपला दणका : महाराष्ट्रासोबत मध्य प्रदेशमध्येही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका!

ओबीसी आरक्षण मिळत नाही, हे केंद्र सरकारचे पाप आहे. आता यावर एकच पर्यात आहे. केंद्र सरकारने अध्यादेश काढून देशातील ओबीसी आरक्षण वाचवावे. त्यासाठी भाजने पुढाकार घ्यावा. त्याचे श्रेय घ्यावे पण मार्ग काढावा, असं आवाहन भुजबळ यांनी केलं. आम्ही डेटा मागत होतो. तो दिला असता तर आज देशातील ओबीसी आरक्षण धोक्यात आले नसते. त्यांनी डबल गेम खेळायचा प्रयत्न केला. महाराष्ट्राला अडचणीत आणायचे आणि मध्य प्रदेश सांभाळायचे, असं सुरू होतं, अशी टीकाही त्यांनी केली.

भाजपच्या खेळामुळे ओबीसी आरक्षण अडचणीत आले आहे. आम्हाला विचारतात तुम्ही काय केलं? मग आता मध्य प्रदेशने काय केलं, असा प्रश्न आहे. संपूर्ण देश अडचणीत आला आहे. ह्यांची मातृसंस्था आहे. ते सांगतात आरक्षण संपवलं पाहिजे, हा मार्ग आहे का, असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला.

आता केंद्राची जबाबदारी आहे. तुमचे खेळामुळे देशाचे ओबीसी आरक्षण संकटात आले. ते वाचवायचे असेल तर वकिलांशी बोला अध्यादेश काढून ओबीसी आरक्षण वाचवा. आमच्या विरोधात जे बोलतात त्यांनी दिल्लीत जाऊन बसावे आणि मार्ग काढावा, असं भुजबळ म्हणाले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातही निवडणूक घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.