राज्यपालांच्या भेटीनंतर झालेली 'ती' चूक फडणवीसांनी तासाभरातच केली दुरुस्त...

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज भेट घेतली.
bjp leader devendra fadnavis corrects spelling mistake of pravin darekar
bjp leader devendra fadnavis corrects spelling mistake of pravin darekar

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज भेट घेत त्यांना राज्यात मागील काही दिवसांत घडलेल्या सुमारे १०० घटनांची माहिती दिली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटची आता चर्चा होऊ लागली आहे. या ट्विटमध्ये झालेली चूक सुधारण्यासाठी फडणवीसांनी तासाभरात त्याला जोडून दुसरे ट्विट तातडीने केले आहे. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रविण दरेकर, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, राधाकृष्ण विखे पाटील आदी नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. यानंतर फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटरवर हँडलवर या भेटीचे छायाचित्र ट्विट केले. यात त्यांनी सर्व नेत्यांची नावे इंग्रजीत दिली होती. मात्र, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नावाचे स्पेलिंग चुकले होते. त्यांनी दरेकर याऐवजी दारकर असे स्पेलिंग झाले होते. हे ट्विट केल्यानंतर काही वेळाने ही चूक लक्षात आली. त्यामुळे तासाभराने फडणवीसांना त्याला जोडून दुसरे ट्विट केले आणि त्यात दरेकरांचे योग्य स्पेलिंग दिले. या ट्विटची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. 

राज्यपालांच्या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले की, ज्याप्रकारच्या घटना गेल्या काही दिवसात बाहेर येत आहेत, अशा १०० घटना राज्यपालांच्या लक्षात आणून दिली. सरकारने संविधानिक जबाबदारीचे पालन केलेले नाही. या घटनांवर मुख्यमंत्र्यांचे मौन हे चिंताजनक आहे. ते एक शब्दही बोलत नाही. राज्यात काँग्रेस अस्तित्वहीन दिसत आहे. त्यांचे नेते दिल्लीत वेगळे आणि इथे वेगळे बोलतात. 

महाविकास आघाडी सरकार नव्हे महावसुली सरकार आहे. त्यांनी सगळी नैतिकता पायाखाली तुडवली आहे. केवळ सत्तेसाठी हे काम सुरू आहे. महावसुली सरकारमध्ये काँग्रेसला किती हिस्सा आणि वाटा मिळतो? आज राज्यपालांना भेटून वेगवेगळ्या घटना मांडल्या आहेत. मुख्यमंत्री जर बोलत नसतील तर संविधानिक प्रमुख म्हणून राज्यपालांनी त्यांना बोलते केले पाहिजे. या घटनांवर सरकारने काय कारवाई केली, त्यांच्याकडून अहवाल घेतला पाहिजे, अशी मागणी त्यांना भेटून केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहे. त्यांनी बोलायला हवे. पण त्यांना माहित आहे, यावर बोलणे अवघड आहे. बोलले तर चौकशीचे आदेश द्यावे लागतील. सरकार आणि हप्ताखोरी वाचविण्यासाठी हे सर्व चालले आहे. सरकारकडून का कोणी बोलत नाही. तिन्ही पक्ष एकत्रित आहेत. हप्तावसुलीत सगळे सोबत आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com