बाळासाहेबांच्या आडून फडणवीस अन् राऊतांनी साधला नेम!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनामित्त त्यांना अभिवादन करतानाही भाजप आणि शिवसेना नेत्यांनी एकमेकांना लक्ष्य केले.
bjp leader devendra fadnavis and shivsena leader sanjay raut target each other
bjp leader devendra fadnavis and shivsena leader sanjay raut target each other

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त आज शिवसेना आणि भाजप नेत्यांनी एकमेकांवर निशाणा साधला. बाळासाहेबांचा दाखला देत एकमेकांना आरसा दाखवण्याच्या या नेत्यांच्या खेळाची चर्चा दिवसभर सुरू होती. सकाळी एकमेकांवर निशाणा साधल्यानंतर संध्याकाळी मात्र, सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी उपस्थित होते.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांना अभिवादन करीत  एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात बाळासाहेबांच्या भाषणातील काही मुद्द्यांचा उल्लेख आहे. "जनतेनं विश्‍वासानं तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही तिकडे जाता? पैशांसाठी? पैशांचे लाचार व्हाल तर शिवरायांचे नाव घेऊ नका, तो भगवा झेंडा हातात घेऊ नका. हे गुण मराठ्यांच्या रक्तात असता कामा नये. तुमच्याकडे लोक आदराने पाहतायत. तो आदर तसाच ठेवा,' अशी बाळासाहेबांच्या भाषणातील वाक्‍ये या व्हिडीओत आहेत. 

फडणवीस यांनी म्हटले आहे की, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांसाठी कायम संघर्ष करत राहू. तुम्ही त्यांच्या विचारात भेसळ केली असेल; पण आम्ही नाही केली. अलीकडच्या राजकारणात नेत्यांची मने छोटी होतात. ते आपल्यापलीकडचे पाहू शकत नाही; पण बाळासाहेबांचे मन राजासारखे होते.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधण्याची संधी आज सोडली नाही. संजय राऊत यांनी म्हटले आहे की, स्थानिक पक्ष स्थापन करण्याची सुरुवात बाळासाहेबांनीच केली. शिवसेना होती म्हणूनच भाजप गावागावांत पोहचली. महाराष्ट्रात भाजपचे अस्तित्व नव्हते. युती केल्यानंतर शिवसेनेबरोबरच भाजपचाही प्रचार झाला. त्यामुळे भाजप गावागावांत पोहचला. बाळासाहेबांनी युती केली नसती तर आज भाजप ग्रामीण भागात वाढला नसता. 

बाळासाहेबांनी मराठी माणसाला लढण्याची प्रेरणा दिली, बळ दिले, हिंदुत्वाची लाट निर्माण केली. राज्याच्या, देशाच्या राजकारणाला वेगळे वळण दिले. असा नेता शतकातून एकदाच निर्माण होतो, असेही राऊत यांनी नमूद केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com