चाकणकरांना शूर्पणखा म्हणालेच नाही; चित्रा वाघांचे घूमजाव

रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणे आहे.
चाकणकरांना शूर्पणखा म्हणालेच नाही; चित्रा वाघांचे घूमजाव
chitra wagh, rupali chakankarsarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी (State Womens Commission) निवड जवळपास निश्चित झाली आहे. महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शूर्पणखा’ बसवू नका, असे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले होते. मात्र, त्यावरुन टीका होऊ लागल्यानंतर वाघ यांनी घूमजाव केले आहे.

या संदर्भात चित्रा वाघ यांनी ट्वीट केले होते. त्यामध्ये त्या म्हणाल्या होत्या की ''महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणे आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शूर्पणखा’ बसवू नका, अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापले जाईल.'' यावरुन आता चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत धुमजाव केले आहे. त्या म्हणाल्या की मी रुपाली चाकणकर यांनी शूर्पणखा म्हटले नाही.

chitra wagh, rupali chakankar
अजितदादांकडून शिवसेनेला दे धक्का; बारणेंच्या विश्वासू सहकाऱ्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

राज्यात महिला आत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे महिला आयोगाला अध्यक्ष मिळावा. त्या पदाची एक गरिमा आहे, ते संविधानिक पद आहे. माझ्या बोलण्यात कुठेही रुपाली चाकणकर यांचे नाव नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनाही इशारा दिला. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. ही नियुक्ती रद्द करण्यात आल्यानंतर आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षपदाची संधी मिळाली.

chitra wagh, rupali chakankar
पुण्यानंतर पिंपरीतूनही तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीला उच्च न्यायालयात आव्हान

वाघ भाजपमध्ये गेल्यानंतर राज्यात राष्ट्रवादीचे महिला संघटन मजबूत करण्यासाठीही रुपाली चाकणकरांनी मेहनत घेतली आहे. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात विविध आंदोलने करताना दिसतात. महामंडळाच्या नियुक्तीवर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये समान वाटप झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.