अजून किती बगलबच्च्यांना वाचवणार आहात; चित्रा वाघ आक्रमक

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल अशोक गावडे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
Chitra Wagh, Bjp Leader
Chitra Wagh, Bjp LeaderSarkarnama

मुंबई : राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याबद्दल अक्षेपार्ह केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे अडचणीत आले आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता गावडे यांच्याविरोधात वाशी पोलिस ठाण्यात कलम ५०९ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यामध्ये अजून काही कलमे लावायला पाहिजे होती, यावरुन वाघ यांनी राज्य सरकारवर तोफ डागली आहे.

Chitra Wagh, Bjp Leader
अमृता फडणवीसांबद्दलचं अक्षेपार्ह बोलणं अंगलट; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अडचणीत

या संदर्भात वाघ यांनी ट्वीट केले आहे. त्या म्हणाल्या, राष्ट्रवादी नवीमुंबईचा हरामखोर जिल्हाध्यक्ष अशोक गावडे सार्वजनिक ठिकाणी विरोधीपक्ष नेत्याच्या पत्नीचा आक्षेपार्ह उल्लेख करतो...हे वक्तव्य राज्यात घरोघरी सोशल मिडीयाच्या माध्यमातून पोहोचले हि बदनामी नाही? तरीही महाराष्ट्राचे गृहमंत्री या एफआयआरमध्ये ५०९ सोबत ITsection लावले नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

अजून किती बगलबच्च्यांना वाचवणार आहात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. वैजापूर-सेनेच्या आमदाराला अजामिनपात्र गुन्हा असतांनाही जामिनपात्र करून बाहेर काढले. सेनेचा नेता रघुनाथ कुचिक ने एका मुलीवर बलात्कार जबरदस्तीने गर्भपातचे सगळे पुरावे देऊनही जामिनावर बाहेर. राज्यातील महिलांचे तळतळाट या सरकारला भोवल्याशिवाय रहाणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

Chitra Wagh, Bjp Leader
चंपा, टरबूज अन्...; राष्ट्रवादीच्या आमदाराची जीभ घसरली

दरम्यान, भाजपच्या जिल्हाध्यक्ष दुर्गा डोख यांनी दिलेल्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्त्री वर्गाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ गावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल होईपर्यंत संघर्ष करण्याची भूमिका भाजपकडून घेण्यात आली होती. तसेच गावडे यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागावी अन्यथा त्यांना नवी मुंबईत महिला फिरू देणार नाही, असा इशाराही भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी दिला होता.

काय म्हणाले होते गावडे?

वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मालिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाई विरोधात आंदोलन चालू होते. त्यावेळी गावेडे यांनी आक्षेपार्ह विधान केले. ते म्हणाले, "आमच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पत्नी अशा पध्दतीने कोठेही टीका करत नाही. परंतु ही....मात्र, रस्त्यावर येऊन बोलते". मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांच्या धर्मपत्नीने कशा प्रकारचे वक्तव्य केले पाहिजे, असे सांगत त्यांनी अक्कलही काढली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com