Ashish Shelar : भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेत, शेलारांनी शिवसेनेला डिवचलं

Ashish Shelar : भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड.. आमचा गड म्हणून मिरवायचे… आता बघा कसे सगळे गडगडायला लागलेय
Aditya Thackeray, Ashish Shelar Latest News
Aditya Thackeray, Ashish Shelar Latest NewsSarkarnama

मुंबई : सध्या शिवसेना आणि भाजपा यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला आहे. भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी विधानभवनाबाहेरून “आम्ही गड वगैरे काही मानत नाही”, म्हणत शिवसेनेला आणि अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरेंनाच (Aditya Thackeray)आव्हान दिले आहे. (Ashish Shelar news update)

"वरळी हा आमचा गड आहे," असा दावा युवानेता आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यावर प्रत्युत्तर म्हणून आशिष शेलार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. ‘भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेत… लवकरच.. मुंबईकरच वरळीतून कोसळणाऱ्या थरांचा थरार निवडणूकीत “करुन दाखवतील” आमचं ठरलंय!!’ असं टि्वट आशिष शेलार यांनी केलं आहे.

वरळी हा शिवसेनेचा गड असल्याची प्रतिमा असताना भाजपानं तिथेच लक्ष्य केंद्रीत केल्यामुळे हा कलगीतुरा चांगलाच रंगण्याची शक्यता दिसू लागली आहे. शिवसेनेनेचे आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून आमदार आहेत. त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि पहिल्याच निवडणुकीत ते जिंकून आले. मात्र, ते मोदी लाटेतून जिंकून आले असून युतीमध्ये होते म्हणून आमदार बनले असा दावा आशिष शेलार यांनी काल (बुधवारी) केला होता.

Aditya Thackeray, Ashish Shelar Latest News
Bachchu Kadu : मी नाराज नाही ; मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला आहे !

“ज्या वरळीत सेनेच्या(?) खासदार, आमदार, माजी मंत्री, माजी महापौर आणि नगरसेवक असे नेत्यांचे थरावर थर आहेत, तिथे म्हणे पक्षाला द्यायच्या 100 रूपयांच्या शपथपत्राला “बळ” अपुरे पडतेय… दुसरीकडे भाजपाची जांबोरी मैदानातील दहिहंडी मुंबईकरांच्या प्रचंड प्रतिसादाने लक्षवेधी ठरतेय,” असं आशिष शेलार यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

आपल्या टि्वटमध्ये शेलार म्हणतात, "भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड.. आमचा गड म्हणून मिरवायचे… आता बघा कसे सगळे गडगडायला लागलेय. भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेत… लवकरच.. मुंबईकरच वरळीतून कोसळणाऱ्या थरांचा थरार निवडणुकीत “करून दाखवतील” आमचं ठरलंय!"

आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात भाजपकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी येथे शिवसेना आमदार सचिन अहिर हे दहीहंडी उत्सव साजरा करत होते. मात्र यंदा भाजपने त्याच्या आधीच मैदान मिळवले असल्याने अहिरांची मात्र पंचाईत झाली आहे.यावरुन आता आदित्य ठाकरे आणि भाजपचा 'सामना' रंगला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सव पार पडणार आहे. या माध्यमातून मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com