BJP : "पाकिस्तान जिंदाबाद" म्हणणाऱ्यांना ठेचून मारा ; आशिष शेलार आक्रमक

Ashish Shelar : "आदित्य ठाकरेच्या पेंग्विन सेनेची भूमिका लोकाना भ्रमित करण्याची आहे.
 Ashish Shelar
Ashish Shelar sarkarnama

मुंबई : एटीएस आणि एनआयएच्या पथकाने पुण्यात कारवाई करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI)काही कार्यकर्त्यांना अटक केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने निषेध आंदोलनात सहभागी झालेल्या तब्बल 60 ते 70 कार्यकर्त्यांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (PFI latest news)

ताब्यात घेतल्यानंतर काही आंदोलनकर्त्यानी यावेळी "पाकिस्तान जिंदाबाद" अशा घोषणा दिल्या. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरुन सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे, संबधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नेटकरी करीत आहेत.

भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी यावर नाराजी व्यक्त करीत संबधितांना इशारा दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आशिष शेलार म्हणाले, "पुण्यात "पाकिस्तान जिंदाबाद"च्या घोषणा देणाऱ्यांना ठेचून मारले पाहिजे,"

 Ashish Shelar
Shiv Sena : उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर मिलिंद नार्वेकर गेले कुठे ?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, यावरुन सध्या राजकारण तापलं आहे. यावर शेलार यांना पत्रकारांनी विचारले असता, ते म्हणाले, "गृहमंत्र्यांनी वेळ दिला तर त्यांना कुणीही भेटू शकतात. खडसेबाबत गृहमंत्री निर्णय घेतील मी काय बोलू,"

वेदांता प्रकल्प गुजरात गेला, यावरुन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. याबाबत शेलार म्हणाले, "आदित्य ठाकरेच्या पेंग्विन सेनेची भूमिका लोकाना भ्रमित करण्याची आहे. मराठी -गुजरातीचा वाद आणि द्वेष निर्माण करत आहेत.ते धादांत खोटं बोलत आहेत,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com