
Ashish Shelar News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची रविवारी खेडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेमध्ये ठाकरे यांनी भाजप (BJP) आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. त्याचे आता राजकीय वर्तुळात पडसाद उमटत आहेत. ठाकरे यांच्या सभेवर भाजप नेते आशिष शेलार यांनी शेलक्या शब्दांत टीका केली.
आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशणा साधला. ट्वीटमध्ये शेलार म्हणाले, ''मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून ज्यांनी महाराष्ट्रात मते मिळवली आणि नंतर गद्दारी केली. तेच आज आम्हाला मोदींच्या फोटोवरून आव्हान देतात? कोकणात शिमगा असल्याने जनता फारसे गांभीर्याने घेणार नाही. कालच्या सभेतील सोंगांनी आणि बोंबा मारायच्या कार्यक्रमाने मनोरंजन झाले.''
''आधे इधर गए... आधे उधर गए.. अकेले "असरानी" बचगएं आता महाराष्ट्रात "असरानी" जिथे जिथे फिरतील तिथे तुफान मनोरंजन होणार..!'' असा टोला शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. शेलार यांनी ठाकरेंची तुलना 'शोले' चित्रपटातील असरानींच्या जेलर या व्यक्तिरेखेशी केली. असरानींचा एक संवाद शेलार यांनी ट्वीट केले आहे.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. या मैदानाचे नावं चांगले आहे, गोळीबार मैदान. मात्र, ही ढेगणे चिरडायला तोफेची आणि गोळीबाराची गरज नाही. तुमचे एकच बोट मतदानाच्या दिवशी यांना संपवेल. कुटुंब मानले, त्यांनी आपल्यावर वार केले, असे अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी खेडमधील सभेत शिंदे गटावर टीका केली होती.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.