तुम्हाला कायदा, संविधान काही तरी कळते का? शेलारांनी राऊतांना ठरवलं 'गजनी'...

मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्यावरून विरोधकांकडून सरकारवर टीका.
Ashish Shelar Latest News, Sanjay Raut News
Ashish Shelar Latest News, Sanjay Raut NewsSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन पंधरा दिवस उलटले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यावरून आता विरोधकांकडून टीका होऊ लागली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शनिवारी ट्विट करून संविधानातील कलम 164-1A चा हवाला देत राज्य मंत्रिमंडळात 12 मंत्री असणे आवश्यक असल्याची आठवण करून दिली. तर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी संविधानाचाच आधार घेत राऊतांना 'गजनी' ठरवलं. (Ashish Shelar Latest Marathi News)

संजय राऊतांनी एक टि्वट केले आहे. यामध्ये त्यांनी घटनेच्या कलम 164-1A चा हवाला देत राज्य मंत्रिमंडळात 12 मंत्री असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. यापेक्षा कमी संख्या असेल, तर संविधान त्या मंत्रिमंडळाला मान्यता देत नाही. गेल्या 2 आठवड्यांपासून महाराष्ट्रातील 2 मंत्र्यांनी (शिंदे-फडणवीस) घेतलेल्या निर्णयांची घटनात्मक वैधता नाही, असे राऊतांनी म्हटले आहे.

Ashish Shelar Latest News, Sanjay Raut News
उद्धव ठाकरे -एकनाथ शिंदे भेटणार ; भाजपला धन्यवाद, शिवसेना नेत्याच्या टि्वटमुळे खळबळ

शेलार यांनी राऊतांना प्रत्युत्तर देताना गजनी चित्रपटाची आठवण करून दिली. संजय राऊत हे चित्रपट निर्मिती राहिले आहेत. त्यामुळे यांनी घरी जाऊन गजनी चित्रपट बघावा. महाविकस आघाडी सरकार स्थापन केल्यावर 32 दिवस किती मंत्री होते, असा सवाल करत शेलार यांनी शिंदे सरकार बेकायदेशीर नसल्याचे ठणकावून सांगितले.

शेलार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, महाविकास आघाडीत 7 जणांच्या मंत्रिमंडळाने 32 दिवस निर्णय घेतले आणि आता म्हणे संविधानाचे अनुच्छेद 164 (1A) सांगते 12 सदस्यांचे मंत्रिमंडळ हवे. अहो तुम्हाला कायदा, संविधान काही तरी कळते का? संविधानातील हे कलम मंत्रिमंडळाचा आकार किती असावा, याच्याशी संबंधित आहे.

विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येपेक्षा 15 टक्के अधिक मंत्री नको,पण असे करताना किमान 12 असा त्याचा अर्थ आहे. उदा. गोवा अशा लहान राज्यांसाठी ही तरतूद. तेथे नियमाने केवळ 6 मंत्री होऊ शकतात. पण या नियमाने 12 आहेत. विस्ताराच्या कालावधीचा या संविधानाच्या कलमात कुठेही उल्लेख नाही. अज्ञान आणि विपर्यासाचा काळ संपला ना मा. खासदार संजय राऊतजी,' असा टोला शेलारांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in