आशिष शेलारांचे शिवसेनेला आव्हान ; म्हणाले, 'लढाई आता सुरु'

आता कडेलोट झालाय..बदल व्हायलाच हवाय..लढाई आता सुरु! चला मुंबईकर जिंकण्यासाठी आपण लढू
 Ashish Shelar , Cm Uddhav Thackeray
Ashish Shelar , Cm Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी २५ समित्यांचे अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर केल्या. निवडणूक संचालन समितीच्या अध्यक्षपदी आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या संचलन समिती अध्यक्षपदी निवड होताच शेलार आक्रमक झाले आहेत. त्यांनी टि्वट करीत शिवसेनेला (shivsena)आव्हान दिलं आहे.

''गेली 25 वर्षे  मुंबईकर भोगत असलेल्या यातनांचा आता कडेलोट झालाय..बदल व्हायलाच हवाय..लढाई आता सुरु! चला मुंबईकर जिंकण्यासाठी आपण लढू!!'' असे टि्वट आशिष शेलार यांनी केलं आहे. शेलारांच्या या टि्वटला शिवसेना आता काय उत्तर देणार हे लवकरच समजेल.

आशिष शेलार यांच्याकडे निवडणूक संचलन समिती अध्यक्ष जबाबदार दिली आहे. या समितीत राहुल नार्वेकर, कालिदास कोळंबकर, प्रकाश मेहता, नितेश राणे हे सदस्य असणार आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे 2017 च्या मुंबई पालिका निवडणुकीत भाजपला 80च्या वर जागा जिंकता आल्या होत्या. त्यामुळे यावेळी देखील भाजपने त्यांच्याकडे निवडणूक संचलन समिती अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप आता आमने सामने ठाकले आहेत.

 Ashish Shelar , Cm Uddhav Thackeray
भाजपनं आशिष शेलारांना दिली मोठी जबाबदारी

जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी खासदार पूनम महाजन यांची नियुक्ती करण्यात आली असून माध्यम विभाग समिती अध्यक्ष पदाची जबाबदारी आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची प्रशासन समन्वयपदी नेमणूक करण्यात आली आहे. आचार्य पवन त्रिपाठी आणि आमदास विद्या ठाकूर यांच्याकडे विशेष संपर्क प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे. महिला संपर्क समितीची जबाबदारी शलाका साळवी, शीतल गंभीर यांच्याकडे आहे. संजय पांडे यांच्याकडे प्रवाशी कार्यकर्ता समितीची जबाबदारी आहे. भाजप आमदार योगेश सागर हे जाहिरनामा समितीचे सचिव असतील. या समितीत भाजप नेते सुनिल राणे, आर.यू. सिंह, राजहंस सिंह, प्रभाकर शिंदे हे सदस्य आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com