आशिष शेलार पोलिस ठाण्यात; दरेकर, लाड यांच्यासह कार्यकर्ते संतप्त

आशिष शेलार यांच्यावर केलेली कारवाई ही सुड बुद्धीने केलेली कारवाई आहे.
Ashish Shelar
Ashish Shelarsarkarnama

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्याबद्दल भाजप (BJP) नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी अपशब्द वापरल्याबद्दल त्यांच्यावर बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर शेलार यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Ashish Shelar
रुपाली चाकणकर म्हणतात, गरज भासल्यास शेलारांना अटक!

आशिष शेलार यांच्या विरोधात पेडणेकर यांनी तक्रार दाखल केली होती. पेडणेकर यांच्या तक्रारीवरुन शेलार यांच्या विरोधात मरिन लाईन्स पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. पोलिसांनी शेलार यांच्यावर IPC कलन 354 नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गुरुवारी सकाळी शेलार पोलिस स्टेशनला हजर झाले आहेत. भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलिस स्टेशनच्या बाहेर जमा झाले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात धोषणाबाजी केली. त्या मुळे काही काळ पोलिस स्टेशन बाहेर तणावाचे वातावरण तयार झाले होते. यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे.

आशिष शेलार यांच्यावर केलेली कारवाई ही सुड बुद्धीने केलेली कारवाई आहे, असा आरोप भाजप नेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. शेलार यांच्यावर जी कारवाई केली तीच कारवाई शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही करा अशी मागणी भाजपने केली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये शिवसेना-भाजप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.

Ashish Shelar
भाजप-शिवसेना संघर्ष तीव्र; राणेंप्रमाणे आशिष शेलार यांनाही अटक होणार?

दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शेलार यांच्या वक्तव्याबद्दल मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र दिले होते. त्यामध्ये चाकणकर म्हणाल्या, जबाबदार लोकप्रतिनिधींनी महिलांच्या संदर्भात केलेली कोणतीही अवमानकारक वक्तव्य अजिबात खपवून घेतली जाणार नाहीत. त्यामुळे राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेत यासंदर्भातील वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोगाला पाठवून देण्याचे निर्देश मुंबई पोलिस आयुक्तांना दिले होते. किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल बोलताना शेलार यांनी अत्यंत बेताल वक्तव्य केल्याचे समाजमाध्यमातून प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले, असे चाकणकर म्हणाल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com