अखेर पंकजा मुंडे, राम शिंदेंना संधी, दरेकर, लाड अ्न भारतीय रिंगणात?

विधान परिषदेसाठी भाजपची (BJP) नावे जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे
Pankaja Munde, Ram Shinde, Pravin Darekar, Prasad Lad
Pankaja Munde, Ram Shinde, Pravin Darekar, Prasad Ladsarkarnama

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या उमेदवाराबद्दलचे हिशेब सुरु असतानाच विधानपरिषदेची विजयी (Legislative Council elections) समीकरणे कशी असतील याचा अंदाज घेणे सुरु झाले आहे. भाजपची (BJP) सदस्यसंख्या लक्षात घेता सर्वाधिक उमेदवार निवडून येतील हे उघड आहे. (Legislative Council Election Latest News)

त्यामुळे विधान परिषदेसाठी भाजपची नावे जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar), प्रसाद लाड (Prasad Lad) यांना पुन्हा संधी मिळणार आहे. तर माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde), आणि राम शिंदे तसेच श्रीकांत भारतीय यांना संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे भाजप पाचवा उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. परिषदेसाठी गुप्तमतदान असल्याने येथे भाजपची सरशी होवू शकते, अशी अटकळ केली जाते आहे.

Pankaja Munde, Ram Shinde, Pravin Darekar, Prasad Lad
बैठकीत ठरलं; महाविकास आघाडी दोन पार्ट्या करणार!

परिषदेसाठी ९ जून अर्ज भरण्याची अखेरची तारीख असल्याने उद्या नावे निश्चित होतील. १० जूनच्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९ ऐवजी उद्या ता ८ रोजीच नावे निश्चित होवून अर्ज भरले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह सुभाष देसाई, दिवाकर रावते, (शिवसेना) प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड, विनायक मेटे, सुजितसिंह ठाकूर, स्व. आर. एस. सिंह, (सर्व भाजप) संजय दौंड (राष्ट्रवादी) हे दहा सदस्य निवृत्त होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे दोन सदस्य कमी निवडून येतील.

Pankaja Munde, Ram Shinde, Pravin Darekar, Prasad Lad
तेच हॉटेल, तीच वेळ; महाविकास आघाडी भाजपला पुन्हा दाखवणार अस्मान?

विधान परिषदेसाठी 20 जूनला निवडणूक होणार आहे. विधान परिषदेवर निवडून यायचे असेल तर 27 मतांची आवश्यकता असणार आहे. भाजप आणि मित्रपक्ष मिळून संख्याबळ 113 होत आहेत. त्यामुळे भाजपच्या चार जागा निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) 53, शिवसेना (Shivsena) 56 आणि कॉंग्रेसचे (Congress) 44 आमदार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com