विधान परिषद : हायकोर्टाचा निर्णय येताच भाजपला आनंदाच्या उकळ्या फुटल्या..

मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना विधान परिषदेसाठी मतदानाची परवानगी नाहीच
विधान परिषद : हायकोर्टाचा निर्णय येताच भाजपला आनंदाच्या उकळ्या फुटल्या..
Ashish Shelar Sarkarnama

मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी (MLC election 2022) राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) या दोघांना मतदानास उच्च न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर भाजपला आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. आमच्यासाठी हा शुभसंकेत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिली.

उच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना शेलार म्हणाले की मुंबई उच्च न्यायालयातून जी माहिती आली आहे हा भाजपाच्या विजयासाठीचा शुभसंकेत आहे. या निकालानंतर कोटा व त्याची गणिते काय असणार हे पहावे लागेल पण आता तरी हा भाजपाच्या विजयाचा शुभसंकेत आहे.

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यास न्यायालयाने परवानगी नाकारल्याचे वृत्त आल्यानंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना आमदार अँड आशिष शेलार यांनी ही प्रतिक्रिया दिली.

Ashish Shelar
दोन्ही काँग्रेसकडूनचं शिवसेनेचा गेम? फोडाफोडीच्या भीतीनं मुख्यमंत्री ठाकरे पुन्हा टेन्शनमध्ये

प्रकृतीच्या काळजीला प्राधान्यच

भाजपाचे दोन सदस्यांच्या ( आ. मुक्ताताई टिळक आणि आ. लक्ष्मण जगताप) प्रकृतीच्या काळजीला प्राधान्य असेल. त्यांच्या प्रकृतीचा विचार करुनच निर्णय होईल पण सध्या तरी ते मतदानाला येतील, असेही आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले.

कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही, असा ईडीचा युक्तिवाद उच्च न्यायालयाने ग्राह्य धरला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मतदारांची संख्या ही 53 वरून 51 वर आली आहे. त्यामुळे उमेदवारांच्या कोट्याचे पण गणित बदलणार आहे. विधानसभेतील 288 पैकी 285 आमदार मतदान करणार आहेत. त्यामुळे विधान परिषदेच्या विजयासाठीचा कोटा हा 27 वरून 26 वर आला आहे. राष्ट्रवादीकडे विजयासाठी एक मत कमी पडते आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचा निकालावर काही परिणाम होणार का, याची आता उत्सुकता राहणार आहे.

Ashish Shelar
महाडिकांचा असाही विजय; विधान परिषद घालवली पण राज्यसभा मिळवली!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in