भाजप दोन महिलांना देणार मंत्रिपदाची संधी; माधुरी मिसाळ, देवयानी फरांदे यांची नावे आघाडीवर

याशिवाय इतर दोन नावेही चर्चेत आहेत, त्यामुळे भाजपचे दिल्लीत श्रेष्ठी कोणत्या नावार मोहोर उमटवतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
Madhuri Misal-Devyani pharande
Madhuri Misal-Devyani pharandeSarkarnama

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath shinde)-देवेंद्र फडणवीस (devendra Fadnavis ) सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या (cabinet expansion) दुसऱ्या टप्प्यात भारतीय जनता पक्ष (BJP) दोन महिला आमदारांना मंत्रिपदाची संधी देणार आहे. या दोन मंत्रिपदासाठी पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) आणि नाशिकच्या देवयानी फरांदे (Devyani pharande) यांची नावे आघाडीवर आहेत. याशिवाय इतर दोन नावेही चर्चेत आहेत, त्यामुळे भाजपचे दिल्लीत श्रेष्ठी कोणत्या नावार मोहोर उमटवतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. (BJP give chance two women in cabinet expansion; Madhuri Misal, Devyani pharande's names front)

शिंदे गट आणि भाजपचे सरकार आल्यानंतर तब्बल चाळीस दिवसांपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकला नव्हता. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात १८ जणांना मंत्रिपदाची संधी मिळाली होती. त्यामध्ये भाजपचे नऊ, तर शिंदे गटाच्या नऊ आमदारांचा समावेश होता. मात्र, दोघांकडूनही एकही महिलेला मंत्रिपदाची संधी मिळू शकली नव्हती. त्यामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांवर प्रचंड टीका झाली होती. विशेषतः भाजपकडे अनेक प्रबळ दावेदार महिला असूनही त्यांना मंत्रिपद मिळू शकले नव्हते, त्यामुळे भाजपवर सर्व स्तरातून टीका झाली होती.

Madhuri Misal-Devyani pharande
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी तयार? भाजपला आठ तर शिंदे गटाला चार जागा...

दरम्यान, पहिल्या विस्तारात झालेली चूक दुरुस्त करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात भाजपकडून दोन महिला आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली जाणार आहे. या आमदारांमध्ये पुण्यातील पर्वती मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी माधुरी मिसाळ आणि नाशिक मध्य मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांची नावे आघाडीवर आहेत. यामधील ऐकीला कॅबिनेट मंत्रीपदाची, तर ऐकीला राज्यमंत्रीपदावर संधी मिळणार आहे. त्यामुळे कोणाला कॅबिनेट मंत्रीपद मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Madhuri Misal-Devyani pharande
उद्धव ठाकरे यांना कधीही सत्तेचा अभ्यास नव्हता, पण राज्य सरकार...

माधुरी मिसाळ आणि देवयांनी फरांदे यांची नावे आघाडीवर असली तरी आणखी दोघांची नावे मंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. यामध्ये तर मनीषा चौधरी आणि  सीमा हिरे याही इच्छुक आहेत. त्यामुळे भाजप श्रेष्ठी कोणाला नावाला हिरवा कंदील दाखवणार, याकडे नाशिक आणि पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मंत्रिमंडळाचा आगामी विस्तार हा पितृपक्ष पंधरवाडा संपल्यानंतरच होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com