Chitra Wagh News : चित्रा वाघ यांच्याकडे भाजपने दिली मोठी जबाबदारी

Chitra Wagh News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.
Chitra Wagh News
Chitra Wagh Newssarkarnama

Chitra Wagh News : भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्याकडे पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. चित्रा वाघ यांची भाजपच्या (BJP) महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी पूर्ण ताकदीने काम करीन, असे त्या म्हणाल्या आहेत.

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांवर टीका करणे असो, त्यांना प्रत्युत्तर देणे असो, तसेच राज्यातील महिलांचे प्रश्न अधिक आक्रमकपणे मांडण्यात चित्रा वाघ पुढे असतात. त्यामुळे पक्षनेतृत्वाने आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.

Chitra Wagh News
मोठी बातमी : माजी मंत्री दिलीप सोपलांच्या बंगल्यावर स्फोटकं फेकली; बार्शीत खळबळ!

याआधी उमा खापरे यांच्याकडे अध्यक्षपद होते. खापरे या विधान परिषदेवर निवडूण गेल्यानंतर त्यांच्या जागी वाघ यांना संधी देण्यात आली आहे. भाजपने नवी जबाबदारी दिल्यानंतर वाघ म्हणाल्या, मी पदाला पूर्णपणे न्याय देईल. येणाऱ्या दिवसांत पूर्ण ताकदीने काम करेन. तीन वर्षांत तुम्ही मला काम करताना बघितले.

सोमवारपासून माझा दौरा सुरू होणार असल्याचेही त्यांनी जाहिर केले. पहिला दौरा सिंदखेडराजा येथून सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आज मला पक्षाने संधी दिली. मी तुमच्यापेक्षा काही वेगळी नाही. आता आपल्या सर्वांना एकत्रितपणे काम करायचे आहे, असेही आवाहन त्यांनी महिला कार्यकर्त्यांना केले.

Chitra Wagh News
Beed : पंकजा मुंडेंना धक्का, पांगरी सोसायटीची सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात..

बावनकुळे म्हणाले, उमा खापरे या आमदार झाल्यानंतर पक्षाने महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी वाघ यांची निवड केली आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांतील चांगल्या काम करणाऱ्या महिलांना चित्राताईंच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश मिळेल, असे ते म्हणाले. वाघ यांची निवड सार्थ ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com