भाजप शिवसेनेच्या उमेदवारांना घाबरते; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

निवडणूक व्यवस्थेवर वर्चस्व गाजवणे लोकशाहीला शोभणारे नाही
Sanjay Raut
Sanjay Raut

लखनौ : "युपीत भाजप (BJP) शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवारांना घाबरली आहे. आतापर्यंत 6 उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. आमच्या नोएडाच्या उमेदवाराचा अर्ज विनाकारण नाकारण्यात आला. आरओ आणि डीएम ऐकायला तयार नाहीत. निवडणूक व्यवस्थेवर वर्चस्व गाजवणे लोकशाहीला शोभणारे नाही,'असे ट्विट करत शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपवर ताशेरे ओढले आहेत.

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ तोंडावर आलेल्या असताना शिवसेनेनेही आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. तर विरोधी पक्षही एकमेकांवर कुरघोड्या करताना दिसून येत आहेत. अशातच यूपी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर संजय राऊत यांनीही भाजपवर हल्लाबोल केला आहे.

Sanjay Raut
भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द होताच भास्कर जाधवांची पहिली प्रतिक्रिया

शिवसेना नेते संजय राऊत यांनी याआधी यूपीमध्ये शिवसेना कोणत्याही युतीचा भाग नसून यूपीची निवडणूक एकट्याने लढणार असल्याचे सांगितले होते. समाजवादी पक्षाशी आमचे वैचारिक मतभेद आहेत. पण आम्हाला राज्यात बदल हवा आहे. आम्ही यूपीमध्ये दीर्घकाळ काम करत आहोत. मात्र भाजपचे नुकसान करायचे नसल्याने निवडणूक लढवली नाही.

तर, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करत ते इतके ताकदवान नेते आहेत की ते कुठूनही निवडणूक लढवतील, जिंकतील, असे म्हटले होते. मात्र त्याचवेळी शिवसेना यूपीमध्ये 50-100 जागांवर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

दरम्यान, संजय राऊत निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर यूपीच्या अनेक भागात दौरेही करताना दिसत आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आगामी निवडणुकीसाठी पक्षाचे नेते आणि उमेदवार पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरले आहेत. 2022 चा निकाल आपापल्या हितासाठी आणण्यासाठी सर्व पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. माजी आणि विद्यमान मुख्यमंत्रीही आमनेसामने असल्याने 2022 च्या निवडणुका पाहणे रंजक ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in