BJP News : शिवसेनेच्या ‘त्या २० टक्के’ मतांसाठी भाजपचे आक्रमक डावपेच : कार्यकारिणीत ठरली रणनीती

शिवसेनेची ही मते स्वतःकडे खेचण्यासाठी येत्या काळात भाजप आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
Devendra Fadnavis-Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : शिवसेनेत (Shivsena) अभूतपूर्व बंडाळी घडवून आणल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा (BJP) डोळा शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) २० टक्के मतांवर आहे. शिवसेनेची ही वीस टक्के मते ही हिंदुत्ववादी (Hindutva) मते (voting) आहेत. आगामी निवडणुकीत ते आपल्याकडे खेचून आणण्यासाठी भाजपकडून रणनीती आखण्यात आली आहे. या मतांसाठी भाजप आगामी काळात आक्रमक होण्याचे संकेत मिळत आहेत. (BJP eyeing Shiv Sena's 20 percent Hindutva wadi votes)

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मतं आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपमध्ये खलबतं सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारणीत शिवसेनेची हिंदू मते स्वतःकडे खेचण्याची भाजपची रणनीती आहे. शिवसेनेची ही हिंदुत्व मते स्वतःकडे खेचण्यासाठी येत्या काळात भाजप आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
Pawar On AjitDada : अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांचे भाष्य....

शिवसेनेकडे ८० टक्के मराठी, तर २० टक्के हिंदुत्ववादी मते आहेत. या वीस टक्के हिंदुत्ववादी मतांवरच भारतीय जनता पक्षाने डोळा ठेवला आहे. शिवसेनेचे ही २० टक्के हिंदुत्ववादी मते खेचून घेण्यासाठी भाजप मुंबईत हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याबाबत कार्यकारिणीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
Satara : मी शब्द पाळणारा आमदार; कदमांनी फुकटची काळजी करू नये : शिवेंद्रसिंहराजे

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतच शिवसेनेची ही २० टक्के हिंदुत्ववादी मते खेचण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. तसेच, आगामी लोकसभा निवडणुकीत गेल्या टर्महून अधिक खासदार निवडून आणण्याचेही उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. कार्यकारिणीच्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे. त्यामुळे शिवसेनेची हिंदुत्ववादी मते आपल्याच पारड्यात पडावीत, यासाठी भाजपकडून डावपेच आखण्यात येत आहेत.

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
NCP MLA News : राष्ट्रवादीच्या आमदाराला sextortion मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; राजस्थानमधून एकाला अटक

भारतीय जनता पक्षाचे खासदार नसलेल्या मतदारसंघात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विशेष मेहनत घेण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजप हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेणार असल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com