आशिष शेलारांवर भाजपने सोपवली मोठी जबाबदारी; मुंबईची धुरा कुणाकडे?

मुंबई (Mumbai) महापालिका निवडणूक पुढील वर्षी होणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.
Ashish Shelar Latest News
Ashish Shelar Latest NewsSarkarnama

Ashish Shelar : मुंबई : मुंबई (Mumbai) महापालिका निवडणूक पुढील वर्षी होणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. भाजप (BJP) मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या खांद्यावर पक्षाने गुजरात निवडणुकीची जबाबदारी सोपवल्याची माहिती मिळत आहे. पक्षाने त्यांच्याकडे गुजरात निवडणुकीत दहा विधानसभा जागेची जबाबदारी दिली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

शेलार जर गुजरातला (Gujarat) जाणार असणार तर भाजप मुंबई महापालिका निवडणूक कोणाच्या नेतृत्वात लढवणार, असा सवाल उपस्थित होत आहे. गुजरातमध्ये साधारण डिसेंबर महिन्यात निवडणुका पार पडणार आहेत. यातच गुजरातमधील सुरत येथील 10 विधानसभा मतदारसंघांची बाबदारी शेलार आणि त्यांच्या टीमला देण्यात आली आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात मुंबईत महापालिका निवडणूक होणार, असे बोलले जात होत. मात्र यासाठी आता सरकार तयार नाही आहे का, अशी चर्चा रंगली आहे.

Ashish Shelar Latest News
अगामी लोकसभेत सामना रंगणार? अनुराग ठाकूर अन् श्रीकांत शिंदेंचे दावे-प्रतिदावे

सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सरकारला लवकरात लवकर महापालिका निवडणूक घ्या, अशा सूचना केल्या होत्या. त्यावर सरकारने म्हटले होत की, ''मुंबई आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे प्रमाण असते. त्यामुळे महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या पाहिजे. शेलार यांना सुरतची जबाबदारी देणे यातून संकेत मिळतात की, शेलार सुरतमध्ये जर व्यस्त असले. तर मुंबईकडे कोण लक्ष देणार. कारण भाजपसाठी मुंबई महापालिकेची निवडणूक खूप महत्वाची आहे. तसेच संकेतच पक्षाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यात दिली आहेत.

Ashish Shelar Latest News
दुपारची झोप टाळून उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना वेळ दिला; शिंदे गटाची खोचक टीका

दरम्यान मुंबईतल्या राजकारणावर केवळ भाजपचेच वर्चस्व असावे. आता वेळ आली आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जागा दाखवली पाहिजे. भाजपचा एक एक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे. 2019 मधे पहिल्यांदा भाजपचे संपूर्ण बहुमताचे सरकार आले. 2014 मध्ये केवळ दोन जागांसाठी शिवसेनेने युती तोडली होती, असे शाब्दिक हल्ले अमित शहा यांनी शिवसेनेवर केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com