गोव्यात काँग्रेसच्या आत्मविश्वासाचा फुगा फुगला..शिवसेनेचा टोला

काँग्रेसच्या आत्मविश्वासाचा फुगा गोव्यात इतका फुगला आहे की त्यांना सत्यदर्शनाचे वावडे झाले आहे," असे अग्रलेखात म्हटलं आहे.
Sanjay Raut
Sanjay Rautsarkarnama

पुणे : : गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar)हे पणजीतून अपक्ष निवडणूक लढणार आहेत. शुक्रवारी त्यांनी याबाबत बैठक घेवून आपला निर्णय जाहीर केला. त्यांना भाजपने पणजी विधानसभा मतदारसंघातून तिकीट नाकारले असल्याने ते पक्षावर नाराज होते. त्यांना यापुर्वी भाजपने दोन मतदारसंघांचा पर्याच दिला होता. पण पर्रीकर यांनी हे दोन्ही पर्याय नाकारत पणजीतून अपक्ष उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. अग्रलेखात शिवसेनेने काँग्रेसलाही टोला लगावला आहे. "गोव्याच्या राजकारणाचा सध्या खेळखंडोबा झाला आहे. तिकडच्या जनतेलाच तो रोखाला लागणार आहे. काँग्रेसने शहाणपणा दाखवला असता तर गोव्याच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसारखा प्रयोग राबवता आला असता व तो यशस्वीही झाला असता. परंतू काँग्रेसच्या आत्मविश्वासाचा फुगा गोव्यात इतका फुगला आहे की त्यांना सत्यदर्शनाचे वावडे झाले आहे," असे अग्रलेखात म्हटलं आहे.

Sanjay Raut
मोठी बातमी : 'ग्लोबल टिचर' डिसले गुरुजींवर कारवाईची प्रक्रिया सुरु

भाजपने अन्य ठिकाणी दिलेल्या उमेदवारीचे दाखले देत शिवसेनेनं भाजपच्या घराणेशाहीवर हल्लाबोल केला आहे. ''उत्तर प्रदेशात मुलायम सिंह यांच्या सुनेला भाजपने उमेदवारी दिली, ही घराणेशाही नाही काय? दुसऱ्या पक्षातील घराणेशाहीला वाजत गाजत पालखीत बसवायचं आणि मनोहर पर्रिकरांच्या पुत्राच्या बाबतीत कर्तबगारी आणि घराणेशाहीची मोजपट्टी लावायची हा विनोद आहे,'' असं शिवसेनेने म्हटलं आहे.

Sanjay Raut
शिरुर हादरलं ; विधवा महिलेवर आठ जणांनी केला सामूहिक बलात्कार

''पणजीत ज्या बाबुश मोन्सेरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यांच्या पत्नीला ताळगाव मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. विश्वजीत राणेंना वाळपई तर त्यांच्या पत्नी दिव्या यांना पर्ये मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. इथे भाजपच्या धुरिणींना घराणेशाहीचा प्रश्न पडला नाही का'' असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

Sanjay Raut
रामदास कदमांच्या हातातून दापोलीपाठोपाठ मंडणगडही जाणार

गोव्याचे प्रभारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरूवारी उमेदवारी यादी जाहीर केली असून, त्यात पर्रीकरांना डावलण्यात आले आहे. (BJP Denied Ticket to Utpal Parrikar)पणजीतून विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांना भाजपने तिकिट दिले आहे. यामुळे उत्पल पर्रीकर यांना भाजपने डावलल्याचे स्पष्ट झाले आहे. पर्रीकर यांनी पणजीतूनच तिकीट देण्याची मागणी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com