चंद्रकांत पाटलांचे 'ते' विधान वादग्रस्त; भाषणाचा व्हिडीओ डिलीट करण्याचे केंद्रातून आदेश

Chandrakant Patil | BJP | पाटील यांच्यावर भाजपमधून आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही टीका
 Chandrkant Patil
Chandrkant PatilSarkarnama

मुंबई : केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) झाले, तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री झाले. मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. आपल्याला दुःख झाले, पण आपण दुःख पचवून पुढे गेलो. कारण आपल्याला गाडा पुढे हकायचा होता, असे म्हणतं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जाहीर भाषणात भाजपची खदखद बोलून दाखविली. आज पनवेलमध्ये प्रदेश कार्यकारीणी बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी हे मोठे वक्तव्य केले.

 Chandrkant Patil
मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केलं : चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली खदखद

मात्र चंद्रकांत पाटील यांचे हेच वक्तव्य आता वादग्रस्त ठरले असून त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ डिलीट करण्यात आला आहे. भाजपच्या सर्व सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरुन भाषणाचे व्हिडीओ डिलीट करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश थेट केंद्रीय पातळीवरुनच देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावरुन भाजपच्या राज्यातील नेत्यांना केंद्रातील नेत्यांचा निर्णय आवडला नसून नाईलाजस्तव ते तयार झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पाटील यांच्यावर भाजपमधून आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही टीका केली जात आहे.

काय म्हणाले चंद्राकांत पाटील?

चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्याला असा नेता देण्याची आवश्यकता होती की ज्याच्यातून योग्य मेसेज जाईल. आपण जे काही करत आहोत त्याला स्थिरता येईल. त्यामुळे अक्षरश: मनावर दगड ठेवून आपल्या केंद्रीय नेतृत्त्वाने, आपण सर्वांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. आपल्याला दुःख झालं, पण आपण ते दुःख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता.

यावेळी आमदार पाटील यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणूका जिंकण्यासाठीही तयारीला लागण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, आपल्याला मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे आणि त्यावर भगवा फडकवायचा आहे. त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी कामाला लागा. शिवाय आगामी काळात नगरपालिका आणि महानगपालिकांच्याही निवडणुका आहेत. पण यात कोणाला तिकीट मिळालं नाही तर रुसू नका.

आता जेव्हा पासून शपथविधी झाला तेव्हापासून सर्वजण मुंबईत आहेत. त्यामुळे आपापल्या घरी आता चला, कामाला लागा. जेव्हा सर्व ठरेल तेव्हा तुम्हाला पुन्हा बोलावलं जाईल आणि तेही वेळेत. आगामी काळात आपण खूप परिश्रम घेऊ. नेत्यांनी आदेश करायचा नसतो, इच्छा व्यक्त करायची असते, आणि आपण त्याचं पालन करायचं असतं, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in