शिवसेना आमदाराच्या मुलानंच केला रथावर हल्ला! भाजपचा खळबळजनक आरोप

भाजपच्या पोलखोल मोहिमेवरून मुंबईतील राजकीय वातावरण तापलं आहे.
Shivsena BJP News
Shivsena BJP Newssarkarnama

मुंबई : मुंबई महापालिकेतील (BMC) शिवसेनेचा (Shivsena) भ्रष्टाचार उघड करण्यासाठी मुंबई भाजपने (BJP) पोलखोल मोहीम सुरू केली आहे. या मोहीमेतील रथाची मोडतोड करण्यात आली होती. यामागील आरोपींना पकडावे, यासाठी भाजपने आज मोेर्चा काढला. या हल्ल्यामागे चेंबूरमधील शिवसेनेच्या आमदाराचा पुत्र असल्याचा खळबळजनक आरोप भाजपने केला आहे. त्याच्यावर कारवाईची मागणी भाजपने आता लावून धरली आहे. यावरुन आता शिवसेना आणि भाजप आमनेेसामने आले आहेत.

भाजपच्या पोलखोल रथावरील हल्ल्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी चेंबूरचे शिवसेना आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या मुलाकडे भाजपने बोट दाखवले आहे. सीसीटीव्ही रेकॉर्डिंगमध्येही फातर्पेकरांचा मुलगा दिसत आहे. ही घटना मध्यरात्री एकनंतर घडली होती. फातर्पेकरांच्या मुलावर कारवाईचा आग्रह भाजपने धरला आहे. त्याच्या अटकेची मागणी भाजपने लावून धरली आहे. यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना आमनेसामने आले असून, त्यांच्यात जोरदार जुंपली आहे.

Shivsena BJP News
आशिष शेलारांनी शिवसेनेला आव्हान देताच किशोरी पेडणेकरांनी दिलं उत्तर

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या नेतृत्वाखाली चेंबूरमधील अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. या वेळी आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले की, तुम्ही 5 वर्षांत मुंबईकरांची फसवणूक केली असून, त्याचा हिशेब घ्यावा. गेल्या 25 वर्षांत आणि विशेषत: मागच्या 5 वर्षांत तुम्ही मुंबईकरांच्या खिशातून घेतलेल्या पैशाचा अपव्यय केला. दगडफेक करणाऱ्यांना एकचा सांगतो की तारीख अन् वेळ तुम्ही ठरवा आणि दोघं मिळून दगडफेकीचं अभियान करू. नामर्दासारखं वागू नका. पोलिसांना या नामर्दांवर योग्य कारवाई करावी. आम्हाला मुंबई पोलिसांचं कर्तृत्व बघायचं आहे.

Shivsena BJP News
नामर्दासारखं वागू नका, हिंमत असेल तर समोर या! आशिष शेलारांचं शिवसेनेला खुलं आव्हान

या दगडफेकीचं उत्तर आम्ही तसंच दिलं तर ठाकरे सरकार पुढील परिस्थितीला जबाबदार असेल. भाजपचं पोलखोल आणि शिवसेनेचा डब्बागोल अशी अवस्था आहे. भाजपच्या रथाची तोडफोड करणाऱ्यांना पोलिसांनी अटक करावी. आम्ही कुणाचंही नाव घेत नाही पण हा प्रकार करणारी संघटना पळपुटी आहे. पोलिसांनी या कटामागील सूत्रधार शोधून काढावा. पोलिसांनी आरोपींनी पकडल्यानंतर पोलीस त्यांना शिक्षा देतील पण त्यांना मुबंईतून हद्दपार करावं, असेही शेलार यांनी सांगितलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com