किरण मानेचे बोलवते धनी कोण? चित्रा वाघ संतप्त, सोंगाड्याला शिक्षा झालीचं पाहिजे

‘आरोप करणाऱ्या महिला कलाकाराचे पती हे भाजपचे पदाधिकारी,' असल्याचा दावा देखील किरण माने यांनी केला आहे.
Chitra Wagh Statement on Kiran Mane
Chitra Wagh Statement on Kiran Manesarkarnama

मुंबई : ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांच्या फेसबूक पोस्टवरुन सध्या वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. त्यानंतर काही दिवसात किरण माने यांना त्या मालिकेतून काढून टाकण्यात आलं. आपण ही फेसबुक पोस्ट लिहिल्याने आपल्याला मालिकेतून काढलं गेलं, असा आरोप किरण माने यांनी केला. त्यावर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. तर काही कलाकारांनी किरण माने यांचे समर्थन केले आहे. (Chitra Wagh Statement on Kiran Mane)

भाजपच्या (bjp) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी किरण माने यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. किरण माने यांचे बोलवते धनी कोण आहेत, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. वाघ यांनी टि्वट करुन किरण माने यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

आपल्या टि्वटमध्ये चित्रा वाघ म्हणतात की, मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी गैरवर्तन करणा-या किरण मानेला प्रोडक्शन हाउसनं हाकलून दिल आहे. मग मानेनं नवं नाट्य उभं केलं. महिलांचा विनयभंग व पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यावर विखारी टिका करणा-या हरामखोराला सत्ताधारी पाठीशी घालताहेत. कोण आहेत मानेचे बोलवते धनी ? या सोंगाड्यावर कारवाई करा. शिक्षा झालीचं पाहिजे.

‘ज्या महिलांनी पुढे येऊन माझ्या विरोधात तक्रार केली. त्यांनी जे गैरवर्तनाचे मुद्दे सांगितले ते इयत्ता पाचवी ड च्या वर्गातील होते. प्रॉडक्शन हाऊसकडून पुढच्या मोठ्या कारस्थानाचा भाग सुरू झाला आणि अनेक कलाकारांना माझ्या विरोधात बोलण्याची सक्ती करण्यात आली आहे’,असे किरण माने यांनी म्हटले आहे. यासंदर्भात किरण माने यांनी फेसबुकवर भली मोठी पोस्ट देखील शेअर केली आहे.

‘आरोप करणाऱ्या महिला कलाकाराचे पती हे भाजपचे पदाधिकारी,' असल्याचा दावा देखील किरण माने यांनी केला आहे. ‘माझ्यावर करण्यात आलेले गैरवर्तनाचे आरोप हे माझ्या विरोधातील षडयंत्र’, असल्याचा आरोप किरण माने यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केला आहे. राजकीय पोस्ट केली म्हणून मालिकेतून काढून टाकण्यात आले असा आरोप त्यांनी केला. चॅनेलकडून देखील त्यांना मालिकेतून काढून टाकण्याचे कारण स्पष्ट करण्यात आले मात्र किरण माने संदर्भात सुरू झालेला वादला आता नवीन वळण लागलं आहे.

Chitra Wagh Statement on Kiran Mane
हकालपट्टीनंतर रावत म्हणाले, ''भाजपची पोलखोल करणार,'' काँग्रेसच्या वाटेवर

'मुलगी झाली हो' या मालिकेतून अभिनेत्री शर्वनी पिल्ले म्हणजे माऊची आई हिचे पती हे उन्नी पिल्लाई हे वरळीतील भाजपचे पदाधिकारी असून अभिनेत्री शर्वनी पिल्ले ही मनसे चित्रपट सेनेची सभासद असल्याचे किरण माने यांनी सांगितलं. ‘एखादा राजकीय पक्ष माझ्या विरोधात उभा राहत असेल तर याच कारण काय असेल याचा लोकांनी विचार करावा. अशा आरोपांची स्क्रिप्ट कशी तयार झाली असेल हे पण बघा’, असे माने यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com