चंद्रकांत पाटील उतरले रिंगणात; ४ आमदारांना सोबत घेवून गुवाहटीला रवाना

Chandrakant Patil | Shivsena | BJP | Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा गट भाजपसोबत जाणार
Eknath Shinde in Guwahati , Shivsena News, Eknath Shinde News in Marathi, Maharashtra Political Crisis
Eknath Shinde in Guwahati , Shivsena News, Eknath Shinde News in Marathi, Maharashtra Political CrisisSarkarnama

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भाजपला पाठिंबा देवून सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली होती. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे (Shivsena) ३४ बंडखोर आमदार गुवाहटी येथे वास्तव्यास आहेत. याच ठिकाणी भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) रवाना झाले असल्याची बातमी समोर आली होती. त्यांच्यासोबत चार आमदार असल्याचेही समोर आले आहे. मात्र हे आमदार नेमके कोणत्या पक्षाचे आहेत याबाबत अद्याप उलगडा झालेला नाही. ANI या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले होते.(Eknath Shinde latest news)

मात्र याबाबत आता ANI ने खुलासा केला असून हे चंद्रकांत पाटील म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष नसल्याचे सांगितले आहे. याबद्दल ANI ने दिलगीरी देखील व्यक्त केली आहे. त्यामुळे नेमके मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील गुवाहटीला गेले आहेत की गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील गुवाहटीला गेले आहेत याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध होवू शकलेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com