BJP : ठाकरेंनी घेतला धसका ; जेवतानाही त्यांना शिंदे-फडणवीसच दिसत असतील ; बावनकुळेंचा टोला

Chandrashekhar Bawankule : राज ठाकरे हे सर्वांचे मित्र आहेत.
Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeraysarkarnama

नागपूर : अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मनसेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आज मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवतीर्थावर जात राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule ) यांनी भाष्य केलं आहे.

"राज ठाकरे जेव्हा जेव्हा भाजप नेते वा शिंदे गटाच्या नेत्यांशी भेट घेतात, तेव्हा ती प्रत्येक भेट राजकीय असल्याचे म्हणणे चुकीचे आहे. महाराष्ट्र, मुंबईचा विकास कसा करायचा, या मुद्द्यावरही मुख्यमंत्र्यांना अनेकजण भेटत असतात. राज ठाकरेंची भेटही तशीच समजली पाहिजे," असे बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray
Shahjibapu Patil : दोन राऊतांनी आमचं वाटोळं केलं, ठाकरे अन् आमच्यात दरी पडली..

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "राज ठाकरे हे सर्वांचे मित्र आहेत. महाराष्ट्राच्या, मुंबईच्या विकासासाठी ते सर्वांच्या भेटीगाठी घेत असतात. विकासाबाबत चर्चा करण्यासाठीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजप नेते आशिष शेलार यांची भेट घेतली असेल,"

आजच्या 'सामना'मधून शिंदे गटावर शिवसेनेनं निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेची कॉन्ट्रॅक्ट किलरप्रमाणे सुपारी घेतली, अशी घणाघाती टीका आज शिवसेनेने केली. याबाबत बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले, "एकेकाळी संताजी-धनाजी या मावळ्यांची दहशत मोगलांनी घेतली होती. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी शिंदे व फडणवीस यांची दहशत घेतली आहे. त्यामुळे ठाकरे जेव्हा जेवायला बसतात तेव्हाही त्यांनी शिंदे-फडणवीस यांची आठवण येते,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com