नार्वेकरांचं टि्वट ठाकरे सरकारच्या पायाला सुरुंग लावण्यासारखे ; चंद्रकांतदादांचा टोला

''नार्वेकरांनी असं टि्वट करणं हे महाविकास आघाडीच्या पायाला सुरुंग लावणं आहे. महाविकास आघाडी धर्मनिरपेक्ष यावरच आहे ना ?
Chandrakant Patil, Milind Narvekar
Chandrakant Patil, Milind Narvekarsarkarnama

पुणे : आज म्हणजे ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत 16 व्या शतकात बांधण्यात आलेली बाबरी मशीद पाडण्यात आली होती. त्यानंतर देशभर उसळलेल्या दंगलीत सुमारे दोन हजार जणांचा मृत्यू झाला होता. याबाबत शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी टि्वट केलं आहे. त्यानंतर भाजप (bjp) नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधण्यास सुरवात केली आहे.

बाबरी मशिद पाडतानाचा एक फोटो नार्वेकर टि्वट केला आहे. अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir) निर्माणासाठी बलिदान दिलेल्या शिवसैनिकांना त्यांनी नमन केलं आहे. पण या टि्वटमुळे ते भाजपच्या निशाण्यावर आले आहे. भाजपचे नेते नारायण राणे, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नार्वेकरांचा समाचार घेतला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. नार्वेकरांनी केलेल ट्विट हे महाविकास आघाडीच्या पायाला सुरुंग लावणारे असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

''नार्वेकरांनी असं टि्वट करणं हे महाविकास आघाडीच्या पायाला सुरुंग लावणं आहे. महाविकास आघाडी धर्मनिरपेक्ष यावरच आहे ना ? अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन यावर तो मिनार उभा आहे. त्यांचे मातोश्रीशी काही बिनसलं का कळत नाही. कारण असं ट्विट करणं त्यांच्या पायाला सुरुंग लावण्यासारखे आहे,'' असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ''मिलिंद नार्वेकर यांनी अशा प्रकारचे टि्वट केल्यानं त्यांचे अन् 'मातोश्री'याच्यात काही बिनसलं आहे का, अशी शंका येते. नार्वेकर यांनी आघाडी सरकारच्या मनोऱ्यालाच धक्का लावला आहे,''

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी नार्वेकर यांच्या या भूमिकेवर पुण्यातील कार्यक्रमात टीका केली आहे. ''अयोध्या के राम मंदिर के निर्माण हेतु शिवसैनिकों के बलिदान को कोटी कोटी नमन..'' असे टि्वट नावेर्कर यांनी केलं आहे. याबाबत नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अतिशय खोचक शब्दांत टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले, ''मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे नवे शिवसेनाप्रमुख का,'' असा खोचक प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. फडणवीस म्हणाले, 'योग्यच आहे ते. चूक काय आहे त्यामध्ये?''

Chandrakant Patil, Milind Narvekar
ज्योतिरादित्य शिंदेंनी मोदींना दिली ग्वाही; कोकणला देणार भरभरून!

२९ वर्षांपूर्वी आजच्या (६ डिसेंबर) बाबरी विध्वंसाची वादग्रस्त इमारत कारसेवकांच्या जमावाने उद्ध्वस्त केली होती. अयोध्येच्या इतिहासात ६ डिसेंबर ही एक अशी तारीख म्हणून नोंदली गेली आहे, ज्याचे विविध संदर्भ आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या आदेशाने हजारो शिवसैनिक (Shivsena) बाबरी मस्जिद पाडण्यासाठी गेले होते. यावेळी झालेल्या गोळीबारात असंख्य कारसेवकांसोबत शिवसैनिकांचा मृत्यू झाला होता. त्याचीच आठवण म्हणून मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी टि्वट करीत या घटनेत बलिदान देणाऱ्या शिवसैनिकांना अभिवादन केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in