"...तर अपक्षांचं मत बाद होतं" : चंद्रकांत पाटलांनी वाढवलं महाविकास आघाडीचं टेन्शन

Chandrakant Patil | BJP | चंद्रकांत पाटील यांनी सांगितला महत्वाचा नियम
"...तर अपक्षांचं मत बाद होतं" : चंद्रकांत पाटलांनी वाढवलं महाविकास आघाडीचं टेन्शन
Chandrakant Patil News, BJP News in Marathi, Chandrakant Patil Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत ६ जागांसाठी ७ अर्ज आल्यामुळे चुरस सध्या चांगलीच वाढली आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार ७ पैकी भाजपच्या (BJP) २, शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) यांच्या प्रत्येकी १ अशा ५ जागा निवडून येणार आहेत. मात्र सहाव्या जागेसाठी शिवसेनेने संजय पवार (Sanjay Pawar) आणि भाजपने धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांना रिंगणात उतरवलं आहे.

विजयासाठी शिवसेनेला स्वतःची, काँग्रेसची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अतिरिक्त मत वगळता विजयासाठी आणखी १५ मतांची गरज आहे. तर भाजपची अधिकृत अशी १०६ मते आहेत. विजयी मतांच्या कोट्यानुसार भाजपचे २ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. त्यानंतर भाजपकडे जादा २२ मते शिल्लक राहतात. त्यामुळे भाजपला विजयासाठी आणखी ३० मतांची आवश्यकता आहे. या सगळ्या गणितांमुळे सध्या राज्यातील छोट्या पक्षांच्या १५ आणि १४ अपक्ष अशा २९ आमदारांचा भाव वधारला आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि भाजप अशा दोन्ही बाजूंनी अपक्षांना संपर्क करण्यास सुरुवात झाली आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक वक्तव्य करुन महाविकास आघाडीचे टेन्शन चांगलेच वाढले आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

चंद्रकांत पाटील म्हणाले, पक्षांच्या आमदारांना पोलिंग एजंटला आपली मते दाखवावी लागतात. पण अपक्ष आमदारांना मते दाखवावी लागत नाहीत. अपक्षांना कोणताही व्हीप लागू होत नाही. शिवाय अपक्ष आमदार मतदान करण्यास कुणालाही बांधिल नाही. त्यामुळे अपक्ष आमदारांना मते दाखवावी लागत नाहीत. पण त्यांनी मते दाखवली तर ते बाद होतात, असा नियम चंद्रकांत पाटील यांनी सांगितला आहे. त्यामुळे अपक्ष आमदारांच्या बाबतीत घोडेबाजार होणार हे नक्की मानले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in