भाजप उमेदवार मागे घेणार, असे जयंत पाटलांनी अप्रत्यक्षरित्या सांगितलयं...

महाराष्ट्र विधानसभेत Vidhansabha कधी घोडेबाजार Horse market पाहिला नाही. त्यामुळे घोडेबाजार कोण करेल असे वाटत नाही. खास करुन भाजप BJP करणार नाही, असेही जयंत पाटील Jayant Patil यांनी नमुद केले.
भाजप उमेदवार मागे घेणार, असे जयंत पाटलांनी अप्रत्यक्षरित्या सांगितलयं...
Jayant Patilsarkarnama

मुंबई : भाजपला जशी काही मते कमी पडतात तशी काही मते महाविकास आघाडीला कमी पडतात. परंतु आम्हाला असलेल्या अपक्षांच्या पाठिंब्याची बेरीज केली तर आमचा कोटा पूर्ण होतो. त्यामुळे आम्ही राज्यसभेचा सहावा उमेदवार उभा केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज आज दाखल केल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस येईल तेव्हा आपल्यासोबत किती आमदार आहेत, याचा विचार सर्वच पक्ष करतील.

Jayant Patil
शरद पवार मुख्यमंत्र्यांशी बोलणार : संभाजीराजेंना अजूनही आशा..

महाराष्ट्र विधानसभेत कधी घोडेबाजार पाहिला नाही. त्यामुळे घोडेबाजार कोण करेल असे वाटत नाही. खास करुन भाजप करणार नाही असे सांगतानाच जेव्हा उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील त्यावेळी चित्र स्पष्ट होईल असेही जयंत पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in