कारभाऱ्यांचा फक्त कंत्राटांच्या मलईवर डोळा ; आशिष शेलारांची टीका

गेल्या महिनाभरापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांना संप (ST Strike) पुकारला आहे. राज्य सरकारने (Mahavikas Aghadi) भरगोस पगारवाढ देऊनही हजारो कर्मचाऱ्यांनी अद्यापही आंदोनलाचाच पवित्रा घेतला आहे.
Bjp Mla Ashish Shelar And Cm Uddhav Thackeray
Bjp Mla Ashish Shelar And Cm Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढ केल्यानंतरही संप सुरुच आहे. राज्य सरकारमध्ये विलीनीकरण या प्रमुख मागणीवर कर्मचारी ठाम आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी संप मागे घेण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आशिष शेलार ( Ashish Shelar) यांना टि्वट करीत आघाडी सरकारवर (Thackeray government) निशाणा साधला आहे.

आपल्या टि्वटमध्ये आशिष शेलार म्हणतात, ''२०१९ पासून निवृत्त झालेल्या मुंबई महापालिकेतील १ हजार ६०० कर्मचाऱ्यांना अद्याप निवृत्ती लाभ न मिळाल्याने त्यांची परवड होतेय. उपचारासाठी पैसे नसल्याने एका कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.असल्या वसूली नसलेल्या विषयांवर कसे लक्ष देणार? कारभाऱ्यांचा फक्त कंत्राटांच्या मलईवर डोळा’

गेल्या महिनाभरापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांना संप (ST Strike) पुकारला आहे. राज्य सरकारने (Mahavikas Aghadi) भरगोस पगारवाढ देऊनही हजारो कर्मचाऱ्यांनी अद्यापही आंदोनलाचाच पवित्रा घेतला आहे. तर काही जिल्ह्यात एसटी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. जळगावमध्ये (Jalgaon) एसटी वाहतून सुरु केल्यानंतर एसटीवर दगडफेक केल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच आत उस्मानाबादमध्ये (Osamanabad) आगार व्यवस्थापकाला वाहक आणि चालकाकडून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

Bjp Mla Ashish Shelar And Cm Uddhav Thackeray
शेतकऱ्यांना दिलेला शब्द मोदींनी पाळला ; कृषीविषयक कायदे मागे घेण्याचे विधेयक मंजूर

उस्मानाबादमध्ये गेल्या 22 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. मात्र आंदोलनादरम्यान शनिवारी (२७ नोव्हेंबर) जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. उस्मानाबाद आगारातून काही बस सुरू करण्यात येत होत्या. आगार व्यवस्थापक पांडुरंग पाटील स्थानकातील उस्मानाबाद-तुळजापूर बस सोडत होते. अचानक बस वाहकाला चक्कर आली आणि तो खाली कोसळला.

यामुळे आगाराच्या ठिकाणी संप करणारे संपकरी आक्रमक झाले. त्यांनी आगार व्यवस्थापक पांडुरंग पाटील यांना शिवीगाळ करत मारहाण केली, त्यांचे कपडेही फाडण्यात आले. याप्रकरणी व्यवस्थापक पाटील यांनी दोन वाहक आणि एका चालकावर आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंदनगर पोलिसांनी पाटील यांच्या शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी वाहक दत्ता माने, शंकर पडवळ व चालक गणेश मंडोळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com