ही तर तिघाडीतील तीन पक्षांची “महिषासुरी”चाल ; शेलारांचे टीकास्त्र

आशिष शेलार (bjp Ashish Shelar) यांनी महाविकास आघाडीवर (Thackeray Government) टीकास्त्र सोडलंय. आज आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची (maharashtra bandh) हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर शेलारांनी टि्वट करीत ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे.
 Ashish Shelar, Uddhav Thackeray
Ashish Shelar, Uddhav Thackeraysarkarnama

मुंबई : ''आई जगदंबेच्या नवरात्रीत महाराष्ट्र बंद, ही तर तिघाडीतील तीन पक्षांची “महिषासुरी”चाल, आई दुर्गामाते जनतेला दे “बळ”! उधळून टाकील जनता या महिषासुरांचा हा “खेळ”!, अशा शब्दात भाजपचे नेते आशिष शेलार (bjp Ashish Shelar) यांनी महाविकास आघाडीवर (Thackeray Government) टीकास्त्र सोडलंय. आज आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची (maharashtra bandh) हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर शेलारांनी टि्वट करीत ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे.

आपल्या टि्वटमध्ये आशिष शेलार म्हणतात, ''बंद आणि बंद..बंद करा हे बंद..! ज्यांनी मुंबईला बंद करुन आपले दुकान चालवले त्या तथाकथित ''बंदसम्राटांचा” पुन्हा आज इतिहास आठवा.. मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठिंबा देऊन कामगारांना उध्वस्त केले, युनियनच्या नावाने कारखाने बंद करुन कष्टकरी, श्रमिकांना देशोधडीला लावले”

 Ashish Shelar, Uddhav Thackeray
'महाराष्ट्र बंद'चा निर्णय राजकीय हेतूने ; भाजपचा आरोप

“एवढेच कशाला आता, सत्तेत आल्यावर मेट्रो कारशेडचे काम बंद करुन मुंबईकरांना वेठीस धरलेय.. कोस्टल रोडला विरोध...नवी मुंबई, चिपी विमानतळाला विरोध, समृद्धी महामार्गला विरोध.. मेट्रोचेही हे विरोधकच.. हे तर विकासातील गतीरोधक ! बंद आणि विरोध यांचा “धंदा” गोळा होतो त्यावरच “चंदा”!

लखीमपूर खिरी येथे झालेल्या हत्यांकाडाविरुद्ध आज महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) घोषणा केली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी पक्षीय पातळीवर महाराष्ट्र बंदची घोषणा दिली आहे. बंद संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला यशस्वी करण्यासाठी बीड शिवसेना (shivsena) आक्रमक झाली आहे. सकाळीचं रस्त्यावर उतरून दुकानदारांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन शिवसैनिकांकडून केले जात आहे. यावेळी केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. कोल्हापुरात आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com