भाजपची खेळी; कृपाशंकर सिंह यांच्यावर मोठी जबाबदारी

मुंबईत उत्तर भारतीयांच्या मतांची संख्याही मोठी आहे. आगामी पालिका निवडणूक भाजपने आतापासूनच प्रतिष्ठेची केली आहे.
भाजपची खेळी; कृपाशंकर सिंह यांच्यावर मोठी जबाबदारी
Kripashankar SinghSarkarnama

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. उत्तर भारतीय मतदार डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतल्याचे मानले जाते. कृपाशंकर सिंह यांना महाराष्ट्र भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चा प्रभारी पदी नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सिंह यांना नियुक्तीपत्र दिलं. (BJP Kripashankar Singh Latest Marathi News)

मुंबईत उत्तर भारतीयांच्या मतांची संख्याही मोठी आहे. आगामी पालिका निवडणूक (Election) भाजपने आतापासूनच प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेनेला (Shiv Sena) धक्का देण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यासाठी आता कृपाशंकर सिंह यांच्या खांद्यावरही जबाबदारी टाकण्यात आली आहे. सिंह यांना मानणारा मोठा वर्ग मुंबईत आहे. मागील वर्षीचे ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

Kripashankar Singh
राजकीय धमाका होणार; आघाडीतील डझनभर नेते 'एनआयए'च्या रडारवर

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. तसेच आघाडी सरकारमध्ये ते गृह राज्यमंत्रीही होते. मुंबईत जवळपास 40 ते 50 लाख उत्तर भारतीय मतदार आहेत. त्यामुळे महापालिकेतील जवळपास 25 टक्के मतदान उत्तर भारतीयांचे आहे. अनेक मतदारसंघात उत्तर भारतीय मतं निर्णायक ठरतात. मागील काही वर्षात ही मतं भाजपच्या बाजूने झुकत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच कृपाशंकर सिंह यांना महाराष्ट्र भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चा प्रभारी पद देण्यात आल्याची चर्चा आहे.

उत्तर प्रदेश सरकारचं कार्यालय मुंबईत

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठं पाऊल उचललं आहे. त्यांनी यूपी सरकारचं कार्यालय देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत उघडण्याचा निर्णय घेतला आहे. यूपीतील महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकांची सामाजिक सुरक्षा आणि त्यांच्या समस्या सोडवण्याबरोबरच यूपीतील गुंतवणूक वाढवण्यासाठी या कार्यालयाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. (Uttar Pradesh CM Yogi Adityanath Latest Marathi News)

Kripashankar Singh
वाऱ्यामुळे पडला पूल; 'आयएएस' अधिकाऱ्यानं गडकरींना दिला धक्का

सरकारकडूनच याबाबत माहिती देण्यात आली आहे. सरकारच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून लाखो लोक उत्तर प्रदेशात परत आले. यादरम्यान अनेकांना समस्या भेडसावल्या. यापार्श्वभूमीवर विविध राज्यांमध्ये सरकारचं कार्यालय असावं, असं सरकारने निश्चित केलं. त्या माध्यमातून राज्यातील तिथे राहणाऱ्या लोकांची अशा संकटसमयी मदत करता येईल, हा त्यामागचा हेतू आहे.

Kripashankar Singh
राजकीय धमाका होणार; आघाडीतील डझनभर नेते 'एनआयए'च्या रडारवर

संकटसमयी लोकांना सुरक्षितपणे परत आणणे तसेच त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार काम उपलब्ध करून देण्यासाठी कार्यालय काम करेल, असंही या प्रवक्त्यांनी सांगितले. मुंबईत राहणाऱ्या स्थलांतरितांना पर्यटन, सांस्कृतिक आणि उत्तर प्रदेशातील इतर क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करून नव्याने उद्योग सुरू करण्यासाठीही प्रोत्साहित केले जाईल. त्यांना उद्योग उभारणीसाठी विविध संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.