Rajya Sabha Election : कोणता संजय ठरणार अश्वत्थामा ? ; बोंडेंच्या विधानानं खळबळ

"कोणता अश्वत्थामा गेला होता, हे देखील धर्मराजाने सांगितले नव्हते."
Rajya Sabha Election 2022 news Updates in Marathi, Sanjay Raut News
Rajya Sabha Election 2022 news Updates in Marathi, Sanjay Raut Newssarkarnama

मुंबई : राज्यसभेच्या (Rajya Sabha Election 2022) जागांसाठी मतदान सुरु झाले आहे. महाविकास आघाडी आणि भाजपने 'आम्हीच जिंकू'असा दावा केला आहे. भाजपचे उमेदवार अनिल बोंडे (Anil Bonde)यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, आघाडीचे उमेदवार संजय पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. बोंडे हे माध्यमांशी बोलत होते. (Rajya Sabha Election 2022 news Updates in Marathi)

"राज्यसभेच्या तीनही जागा आम्ही जिंकू. आम्हाला आत्मविश्वास आहे. आमच्या मनात या जागेबाबत अजिबात धाकधूक नाही. महाभारतात ज्याप्रमाणे अश्वत्थामा गेला त्याप्रमाणे या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील कोणतातरी एक संजय जाणार,"असे विधान करुन बोंडेंनी खळबळ उडवून दिली आहे.

Rajya Sabha Election 2022 news Updates in Marathi, Sanjay Raut News
राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे नाराज ? मतदानाकडे फिरवली पाठ

"कोणता अश्वत्थामा गेला होता, हे देखील धर्मराजाने सांगितले नव्हते. त्यामुळे कोणता संजय जाणार हे मी सांगणार नाही, ते नंतर कळेल. पण, महाविकास आघाडीतील एक कोणता तरी संजय जाणार नक्की. सायंकाळपर्यंत कोणता ते कळेल,"असे बोंडे म्हणाले

राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) राष्ट्रवादीचे नेते, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur), शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी केलेल्या मतदानावर भाजपने आक्षेप घेतला. यामुळे काही काळ विधानभवनात गोंधळ उडाला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांचा आक्षेप फेटाळून लावला आहे.

आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप

जितेंद्र आव्हाड यांनी मतदान केल्यानंतर थेट जयंत पाटील यांच्या हातात मतपत्रिका दिली, तर अशाच प्रकारे यशोमती ठाकूर यांनी नाना पटोले यांच्या हातात मतपत्रिका दिली, सुहास कांदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिनिधींना दिसेल अशी मतपत्रिका दाखवल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार आणि पराग अळवणी यांनी यावर हरकत घेतली आहे. मतपत्रिका दाखवायची असते, ती हाताळायला द्यायची नसते, असा निवडणुकीचा नियम आहे. त्यामुळे ही दोन्ही मते बाद करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com