ठाकरे अन् ममता यांच्यातील बंद दाराआड चर्चेवर भाजप खवळले

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत.
Ashish Shelar
Ashish Shelar

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamta banarjee) यांनी काल (३० नोव्हेंबर) राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली. मात्र आता या भेटीवरुन वादंग निर्माण झाला आहे. ठाकरे अन् ममता यांच्यातील बंद दाराआड काय चर्चा झाली, याचा खुसाला करावा, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार (Ashish shelar) यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या भेटीवर आक्षेप घेत खुलासा करण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आज त्यांचा मुंबई दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी ममता बॅनर्जी यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली.

Ashish Shelar
आदित्य ठाकरेंची नम्रता आणि ममता बॅनर्जींची विनम्रता!

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यात बंद दाराआड काय चर्चा झाली, कौटुंबिक भेटीचे कारण देत या भेटीबाबत गुप्तता का पाळली जात आहे, याबाबच राज्य सरकारने खुलासा करावा अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे. त्याच बरोबर बंगाल प्रमाणे महाराष्ट्रातही हिंसाचार घडवण्याचा कट तर नाही ना, या भेटीमागे काय उद्देश होता याची माहिती जनतेला द्यावी, असेही आशिष शेलारांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर त्यांनी एकापाठोपाठ ट्विट करत ठाकरेे सरकारवर निशाणा साधला आहे. ''मा.ममता दिदी महाराष्ट्रात आल्या आहेत त्यांचे जोरदार स्वागत सरकार आणि सरकारी पक्ष करतोय... पाहुण्यांचे स्वागत करणे ही परंपराच आहे. त्याबद्दल आक्षेप घ्यावा असे काही नाही. पण... महाराष्ट्रातील उद्योगांना, दिदी पश्चिम बंगालमधे या असे आमंत्रण घेऊन ही त्या आल्या आहेत का?' असा सवाल करत आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीवर ताशेरे ओढले आहेत. ट्विट करत त्यांनी राज्य सरकारकडे या भेटीदरम्यान कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याचा खुसाला करण्याची मागणी केली आहे.

'' इथले उद्योग, व्यवसाय पश्चिम बंगालला घेऊन जाण्यास दिदींना शिवसेना मदत करतेय का?, इथले उद्योग देऊन शिवसेनेला इथल्या तरुणाला फक्त वडापाव विकायलाच लावायचेय का?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच, नुकतीच बांग्लादेशीयांवर कारवाई झाली,यापुढे अशी कारवाई न करण्याची हमी इथले सरकारी पक्ष दिदींना देत तर नाहीना?, असे विचारत त्यांनी या राज्य सरकारकडे या प्रश्नांची उत्तरे मागितली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com